राज्यातील 20 जिल्ह्यात आरोग्यवर्धक दूध वाटप

0
187
Advertisements

चंद्रपूर – पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या वाढदिवसानिमित्त 11 नोव्हेंबर रोजी चंद्रपूर महानगर व चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील तालुक्यांसोबत महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यात आरोग्यवर्धक हळदिचे दूध वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. चंद्रपूर महानगर येथे स्थानिक कस्तुरबा चैक येथून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचे उद्घाटन जनता शिक्ष्ण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा ओबिसी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक श्री. अशोक जीवतोडे यांचे हस्ते संपन्न झाले. यावेळी माजी नगराध्यक्ष श्री. विजय राऊत, महानगर जिल्हाध्यक्ष डाॅ. मंगेश गुलवाडे, श्री. खुशाल बोंडे, राजेश मून, अनिल फुलझेले, राजेंद्र गांधी, माजी महापौर अंजली घोटेकर, हिरामण खोब्रागडे, युवानेता रघुविर अहीर, मोहण चैधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
कोविड-1़9 काळात काढा व हळदिचे दूध गुणकारी तसेच प्रतिकारशक्ती वाढविणारे असल्याने हळदिचे दूध वाटप कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन चंद्रपूर महानगर व लोकसभा क्षेत्रातील सर्व तालुक्यांमध्ये घेण्यात आला. चंद्रपूर महानगरात बाबुपेठ, बंगाली कॅम्प परीसरात कार्यक्रम संपन्न झाला तर बिनबा वार्ड, जटपूरा वार्ड, तुकुम येथे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात मूल, बल्लारपूर, पडोली, घुग्घुस, राजुरा, कोरपना, गोंडपिपरी, पोंभूर्णा, वरोरा, भद्रावती येथे हळदिचे दूध वाटप कार्यक्रम संपन्न झाला. आरोग्यवर्धक हळदिचे दूध सेवनाचा महानगरातील व जिल्ह्यातील हजारो नागरीकांनी लाभ घेतला.
याप्रसंगी नगरसेवक राजेंद्र अडपेवार, संजय कचर्लावार, देवानंद वाढई, मायाताई उईके, प्रदिप किरमे,  राजू घरोटे, राजेंद्र खांडेकर, विनोद शेरकी, तुषार सोम, राजू येले, बाळू कोलनकर, अशोक सोनी, मुन्ना इलटम, स्वप्नील मून, महेश अहीर, अॅड. सारीका संदुरकर, रेणूताई घोडेस्वार, प्रभाताई गुडघे, संदिप देशपांडे, अभिनव लिंगोजवार, प्रणय डंबारे, कपिश उसगांवकर, यश बांगडे, ललीत गुलाणी, जितू शर्मा यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here