चंद्रपूर मनपा हद्दीत फटाके व आतिषबाजीवर पूर्णतः बंदी

0
1831
Advertisements

चंद्रपूर – राज्यात कोरोनाची साथ आल्याने सर्व सणासुदीवर गदा आली आहे, एकही सण यावेळी नागरिकांना साजरा करायला मिळाला नाही.
कोरोना सह आता वायू प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, दिवाळी सारख्या सणात आता चंद्रपूर मनपाने फटाके व आतिषबाजीवर पूर्णतः बंदी करण्यात आली आहे.
राष्ट्रीय हरित लवाद यांच्या आदेशाने संपूर्ण प्रकारचे फटाके व आतिषबाजी वर बंदीचे निर्देश आहे.
त्या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी चंद्रपूर मनपाने कंबर कसली आहे, हवेची गुणवत्ता लक्षात घेता मध्यम श्रेणीतील पर्यावरण पूरक फटाके फोडण्यास दिवाळी काळात रात्री 8 ते 10 पर्यंत मुभा असणार आहे.
उपरोक्त निर्देशांचे पालन न करणाऱ्यांवर व्यावसायिक व नागरिकांवर झोन क्रमांक 1, 2 व 3 मार्फत कार्यवाही करण्याचे निर्देश चंद्रपूर मनपाने दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here