कोरपना तालुक्यात शासकीय जागेत विना परवाना चुनखडी उत्खननाची शंका

0
205
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुका हा आदिवासी बहुल म्हणून ओळखल्या जातो.या तालुक्यात मोठ्याप्रमाणात चुनखडी असल्याने करोडोंचा महसुल शासनाला मिळण्याचे स्त्रोत आहे.मात्र काही ठेकेदार शासनाची कोणतीच परवानगी न घेता नियमबाह्य बिनधास्त काही शासकीय जागांवर चुनखडीचे उत्खनन करून शासनाच्या तिजोरीला लाखोंचा चुना लावत असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.असे असताना येथील तहसीलदार,मंडल अधिकारी,तलाठी यांनी तालुक्यात फेरफटका मारून शहानिशा करावी,शासकीय जागेवर अवैध उत्खनन होत असल्यास कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
तालुक्यात बऱ्याच ठिकाणी विविध प्रकारची कामे सुरू असून यासाठी काही ठेकेदार जंगल बोळातील शासकीय जागेवर राजरोसपणे अवैधरीत्या चुनखडीचे उत्खनन करून शासनाचा महसूल बुडवत आहे.काही चतुर ठेकेदारांनी तर कमालीची शक्कल लढवत पडीत शेती मालकाला हाताशी धरून नाममात्र जागेची लीज मंजूर केली.आणि चक्क महसुल विभागाच्या जागेवर उत्खनन करीत कमी ब्रासची रक्कम भरून कित्येक पटीने ब्रासचा वापर करीत असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.महसुल विभागाने जर आताही याकडे लक्ष न दिल्यास येत्या काही वर्षात जिकडे तिकडे खड्डे पडून तलावाचे स्वरूप येईल यात तिळमात्र ही शंका नाही.तेव्हा खनिकर्म विभागाने तालुक्यात कोणत्या ठिकाणी शासकीय जागेवर अवैध उत्खनन होत आहे याची माहिती घेऊन सुरु असलेला प्रकार थांबवून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करत दंड आकारावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.तालुक्यात कोणत्या ठिकाणी शासकीय जागेवर अवैध उत्खनन सुरू आहे याविषयी शोध मोहिम हाती घेण्यात आली असून लवकरच सविस्तर पहा News34 वर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here