जिवती – चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील “जिवती नगर पंचायत” मधील काँग्रेस व भाजपच्या 4 नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री.राजेंद्र वैद्य महिला जिल्हाध्यक्षा सौ.बेबीताई उईके यांच्या नेतृत्वात व ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष श्री.पंकज पवार,ज्येष्ठ नेते श्री आबिद अली,तालुकाध्यक्ष श्री कैलाश राठोड,माजी तालुका अध्यक्ष श्री राम चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.या नगरसेवकांमध्ये श्री.अमर राठोड,श्री वसंत राठोड़ नगरसेवक, केशव चव्हाण नगरसेवक, शरद चव्हाण या नगरसेवकांनी त्यांच्या समर्थकांसह काँग्रेस,भाजपतील कार्यकर्त्यांनी ज्यात प्रामुख्याने शंकर कारभारी,मोहन जाधव,पंडित पवार,रामराव कारभारी,विष्णु नाईक, गोविन्द नाईक,भीमराव राठोड़,अविनाश नागरगोजे, अविनाश चव्हाण ,दीपक केंद्रे,गजानन गायकवाड़,गोलू केंद्रे,परमेश्वर चव्हाण,धनराज मोरे,नीलेश राठोड़,राहुल राठोड़ यांनी जिवती येथे एका कार्यक्रमात राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला.
कांग्रेस भाजपच्या 4 नगरसेवकांचा राष्ट्रवादी कांग्रेसमध्ये प्रवेश
Advertisements