रस्ता दुरूस्तीसाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक

0
239
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा गोविंदपूर हा राष्ट्रीय महामार्ग तेलंगणा राज्याला जोडला जातो.मोठ्याप्रमाणावर या रस्त्यावरून वाहतूक सुरू असते.काही वर्षापूर्वीच रस्ता डांबरीकरण करण्यात आला.मात्र आता याठिकाणी “खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे” हे कळायला मार्ग नाही.मोटारसायकल स्वारांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे.कोरपना हे तालुक्याचे ठिकाण असल्याने तालुकावासी दररोज याठिकाणी विवीध कामांसाठी ये-जा करतात.कित्येक महिन्यांपासून रस्ता दुरुस्तीची मागणी होत आहे मात्र याकडे सपशेल दुर्लक्ष केले जात आहे.दिवसेंदिवस लहान मोठे अपघात घडत असल्याचे पाहून जणू अपघाताची मालिकाच सुरू झाली की काय अशी भीती निर्माण झाली आहे.याठिकाणी नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून पसरत असलेल्या धुळीमुळे महामार्ग लगतच्या शेत पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान होत आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असून सदर रस्ता त्वरित दुरूस्त करावा अन्यथा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here