राज्य परिवहन मंडळातील कर्मचाऱ्यांचे 3 महिन्याचे वेतन थकले

0
334
Advertisements

चंद्रपूर – लॉकडाउन काळात राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे पगार न झाल्याने त्यांच्या परिवारावर उपासमारीची पाळी आली आहे.
ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असलेल्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीच्या तोंडावर आंदोलनाचे अस्त्र उभारले आहे.
लॉकडाउन काळात एसटी महामंडळाला हजारो कोटींचा फटका बसला आहे, कोरोनाच्या संकटात कर्मचाऱ्यांना वेतन मिळाला नाही, त्यामुळे एसटी कर्मचारी यांनी परिवारासोबत घरासमोर बसून आक्रोश आंदोलन सुरू केले.
दिवाळीपर्यंत कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देण्यात यावे अशी मागणी कर्मचारी संघटनांनी केली आहे.
कोरोनामुळे झालेली खर्चवाढ, यासर्व समस्यांना बिनपगार तोंड कसे द्यावे असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here