गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुक्यातील कन्हाळगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच नारायण हिवरकर यांची भाजप जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.हिवरकर हे गेल्या 15 वर्षापासून भाजपा कोरपना तालुकाध्यक्ष म्हणून कार्यरत होते.या काळात हिवरकर यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या मदतीने तालुका पातळीवर सर्व समाजाच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन विविध प्रकारे आंदोलन करून गोरगरिब,आदिवासी,निराधार,घरकुल धारकांना न्याय मिळवून देत पक्षाच्या बळकटीसाठी अथक परिश्रम घेतले.अत्यंत संयमी,मृदभाषी,शांत स्वभावाचे धनी हिवरकर यांच्या जनोपयोगी, उल्लेखनीय कामांची दखल घेत पदोन्नती म्हणून नुकतीच यांची भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.या निवडीचे औचित्य साधून इतरांबरोबरच कन्हाळगाव येथील बूथ प्रमुख,युवा मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी राजू येरेकर,दिवाकर गेडाम,प्रविण भोयर,नंदू दुर्वे,संतोष पेचे,पिंटू गेडाम,अमोल सोयाम,विशाल किन्नाके,सुधाकर कवलवार,सोनू गेडाम, रामदास येरेकर,सुक्या गेडाम आदी बूथ प्रमुख व भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
भाजप जिल्हा उपाध्यक्षपदी “नारायण हिवरकर” यांची निवड
Advertisements