चंद्रपुरात डॉक्टरांचा हलगर्जीपणा उघड

0
2075
Advertisements

बल्लारपूर – शहरातील गणपती वॉर्डातील एका महिलेची तब्येत अचानक बिघडल्याने त्या महिलेला चंद्रपूर शहरातील खाजगी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्या महिलेला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
दुःखात बुडालेल्या महिलेच्या परिवारातील सदस्यांनी महिलेचा मृतदेह घरी आणत फ्रिजर मध्ये ठेवला, त्या महिलेच्या अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली, काही नातेवाईक पोहचले मात्र काही न पोहचल्याने दुसऱ्या दिवशी त्या महिलेचा अंत्यसंस्कार करण्याचे ठरविले.
रात्री 9 वाजताच्या दरम्यान त्या महिलेच्या मृतदेहात हालचाल होऊ लागली, नातलगांनी तात्काळ त्या महिलेला नागपूर येथे उपचारासाठी नेले आता त्या महिलेची प्रकृती स्थिर आहे.
अचानक ती महिला जिवंत झाली जणू चमत्कार झाला असल्याचं नागरिकांनी चर्चाच सुरू केली.
मात्र या सर्व प्रकरणात खाजगी डॉक्टरांनी केलेला हलगर्जीपणा उघड झाला आहे, रुग्णांची योग्य तपासणी न करता तिला मृत घोषित करून बिल वसूल करायचं हा प्रकार न पचण्यायोग्य आहे, अश्या बेजबाबदार डॉक्टरांवर कठोर कारवाई करू त्या डॉक्टरचा वैधकीय परवाना रद्द करण्याची मागणी त्या महिलेचे नातलग व नागरिकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here