नोव्हेंबर महिन्यापासून नागरिकांच्या खिश्याला लागणार कात्री

0
1241
Advertisements

चंद्रपूर – नोव्हेम्बर महिन्यात झालेली नोटबंदी व त्याचे नकारात्मक परिणाम देश वासीयांना सोसावे लागले आता पुन्हा नोव्हेंबर महिन्यापासून सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागणे सुरू होणार आहे.
बँक खात्यात पैसे जमा करणे व काढायला सुद्धा आता ग्राहकांना पैसे मोजावे लागणार आहे.
ते सुद्धा काही ठराविक व्यवहारानंतर बँक ग्राहकांना हे शुल्क भरावे लागणार आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य बँक ऑफ बडोदा हे नियम सर्वात आधी लागू करणार आहे.
कसे असणार हे नवे नियम जाणून घ्या!

चालू खाते, कॅश क्रेडिट लिमिट आणि ओवरड्रॉफ्ट खात्यातून पैसे काढणे व जमा करणे यावर शुल्क असे राहणार आहे.
1 महिन्यात 3 व्यवहारावर व त्यानंतर च्या प्रत्येक व्यवहारावर 150 रुपये शुल्क आकारणी होणार आहे.
बचत खाते धारकांना सुद्धा हा भुर्दंड बसणार आहे, 1 महिन्यात 3 बँक व्यवहार निःशुल्क असले तरी त्यानंतर पैसे जमा करण्यासाठी 40 रुपये तर पैसे काढण्यासाठी 100 रुपये द्यावे लागणार आहे.
या भुर्दंडापासून जेष्ठ नागरिक सुच बचावले गेले नाही, जनधन खातेधारकाना पैसे जमा करणे निःशुल्क मात्र पैसे काढण्यासाठी 100 रुपये द्यावे लागणार आहे.
हा नवीन नियम 1 नोव्हेम्बरपासून लागू करण्यात आला आहे.
कॅश क्रेडिट, चालू खाते, ओव्हरड्रॉफ्ट खातेधारकाना दररोज 1 लाख रुपये जमा करण्यावर मुभा असणार मात्र 1 लाखांहून अधिक रक्कम जमा केल्यास 1 हजार रुपयांवर प्रत्येकी 1 रुपया शुल्क लागणार आहे.
सध्या बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, एक्सिस बँक, सेंट्रल बँक यांनी हे शुल्क लागू करण्याचे संकेत दिले आहे नंतर सर्व बँकांना हा नियम लागू राहणार आहे.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here