ऊर्जानगर येथे राष्ट्रसंतांना मौन श्रद्धांजली

0
170
Advertisements

ऊर्जानगर(चंद्रपूर):-ग्रामगीता तत्वज्ञानाच्या माध्यमातून समस्त मानवाला सर्वधर्मसमभाव व मानवतेचा संदेश देणारे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या तीथीनुसार ५२ व्या स्मृतिदिनानिमित्त श्री गुरुदेव सेवा मंडळ ऊर्जानगर वसाहत कार्यालय येथे सामाजिक अंतर ठेवून व मास्क वापरून गुरुदेव प्रेमींच्या उपस्थित मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
दरवर्षी राष्ट्रसंतांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून मौन श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ऊर्जानगर मधील गुरुदेव प्रेमी मोठ्या संख्येने गुरुकुंज मोझरीला जात असतात परंतु यावर्षी कोविड -१९ च्या वैश्विक संकटामुळे तेथील मुख्य कार्यक्रमाला बाहेरून कोणीही उपस्थित राहू नये असे आवाहन करण्यात आले होते.त्या अनुषंगाने श्रद्धांजली कार्यक्रमात खंड पडू नये म्हणून मोजक्या उपासक व उपासीकांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला.
सकाळी सामुदायिक ध्यान करण्यात आले ध्यानावर मुरलीधर गोहणे यांनी मार्गदर्शन केले नंतर श्रमदानाने परिसर स्वच्छ करण्यात आला.
सायंकाळी सामुदायिक प्रार्थने पूर्वी श्रद्धांजली पर भजनावली कार्यक्रम झाला याचे संचालन मुरलीधर गोहने यांनी केले.यात सदाशिव अघाव यांनी महाराजांचे सुंदर भजन प्रस्तुत केले सोबत प्रशांत दुर्गे व राजेंद्र पोईनकर यांनी साथसंगत केली.
त्यानंतर राष्ट्रसंतांना मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.सामुदायिक प्रार्थना घेण्यात आली प्रार्थनेवर सेवाधिकारी शंकर दरेकर यांनी मार्गदर्शन केले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
सदर कार्यक्रमाला गुरुदेव प्रेमिंचे मोलाचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here