आदिवासी महिला घरकुल प्रकरण…..!

0
209
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुक्यातील धानोली तांडा येथील आनंदाबाई वसंता मडावी या आदिवासी महिलेचा 2015,16 इंदिरा आवास व 2016,17 यावर्षी शबरी आवास योजनेंतर्गत अशाप्रकारे दोनदा घरकुल मंजूर झाले.परंतु चार वर्षाच्या कालावधी लोटूनही घरकुलाचा लाभ मिळाला नाही. राहायला घर नसल्याने लोकांच्या गोठ्यात राहत असल्याची माहिती उपोषणकर्ता महिलेने दिली असून याला पं.स.प्रशासन जबाबदार असल्याचे आरोप होत आहे. अखेर न्याय मागणीसाठी सदर लाभार्थी महिला आनंदाबाई गेडाम आणि न्याय मिळवून देण्यासाठी स्वत: सरपंच विजय रणदिवे यांनी पं.स.समोर आमरण उपोषण सुरू केले.सदर आदिवासी महिलेवर होत असलेल्या अन्यायाबद्दल अनेकदा पं.स.प्रशासनाला निवेदने देऊनही याकडे दुर्लक्ष होत असल्याचे पाहून शेवटी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागल्याची माहिती देण्यात आली होती.आणि जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेतला जाणार नाही असा पवित्रा उपोषणकर्त्यांनी घेतला होता.अनेक जण उपोषणकर्त्यांची भेट घेऊन पाठींबा दर्शवित होते.दरम्यान दुसऱ्या दिवशी भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी उपोषण मंडपाला भेट दिली.घरकुल लाभार्थी आनंदाबाई मडावी या आदिवासी महिलेवर स्थानिक पं.स.प्रशासनाने केलेला अन्याय व घरकुलपासून वंचित ठेवल्या संबंधी सविस्तर चर्चा करून मुख्यकार्यपालन अधिकारी यांना दूरध्वनीवरून पटवून दिली.काही वेळातच पं.स.तर्फे मागण्या मान्य केल्यासंबंधी लेखी आश्वासनाचे पत्र देण्यात आले आणि उपोषणाची सांगता करण्यात आली.यावेळी तहसीलदार वाकलेकर,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा कन्हाळगावचे उपसरपंच नारायण हिवरकर,सुनील उरकुडे,नगरसेवक अमोल आसेकर,नगरसेवक किशोर बावणे,पुरुषात्तम भोंगळे,शशिकांत आडकीने,अरूण मडावी,ओम पवार व इतरांच्या उपस्थितीत घरकुल लाभार्थी महिला आनंदाबाई मडावी व सरपंच विजय रणदिवे यांचे उपोषण सोडविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here