घरफोडीच्या गुन्ह्याचा शहर पोलिसांनी लावला छडा

0
399
Advertisements

चंद्रपूर – शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत लालपेठ परिसरात 26 ऑक्टोम्बरला घरफोडी झाल्याची तक्रार येल्लाबाई भगत यांनी नोंदविली होती.
भगत यांच्या घरून दुचाकी वाहन, कलर टीव्ही, इलेक्ट्रिक शेगडी, 1 स्टेपलायजर असा एकूण 54 हजारांचा माल चोरी गेला होता.
शहर पोलीस स्टेशनचे नवे पोलीस निरीक्षक सुधाकर अंभोरे व डीबी इंचार्ज कोडापे व कर्मचाऱ्यांनी तपासाची चक्रे फिरविली असता त्यांनी 6 नोव्हेम्बरला एका इसमाला ताब्यात घेतले.

पोलिसांनी कसून चौकशी केली असता आरोपीने घरफोडी केली असल्याची कबुली दिली, पोलिसांनी आरोपीकडून चोरी गेलेला मुद्देमाल जप्त केला.
सदरची कारवाई पोलीस कर्मचारी विलास निकोडे व पोलीस कर्मचारी यांनी यशस्वीपणे पार पाडली, पुढील तपास शहर पोलीस ठाणे करीत आहे.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here