चंद्रपूर:- कर्नाटक पाॅवर कार्पोरेशन लिमी. व्दारा बरांज ता. भद्रावती येथील खुली कोळसा खदान दि. 31 मार्च 2015 पासून बंद आहे. ही खाण पूर्वरत सुरू करण्याच्या हालचाली खाण प्रशासनाकडुन सुरू आहेत. या प्रकल्पातील प्रकल्पग्रस्त बरांज (मोकासा) व चेक बरांज या गावांचे पुनर्वसन, प्रकल्पग्रस्त व ईतर कामगारांच्या स्थायी नौकरीचा विषय तसेच इतर समस्या अद्यापपावेतो KPCL नी मार्गी लावलेल्या नाहीत. यासंदर्भात आज पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचेसोबत बैठक घेवून चर्चा केली. प्रकल्पग्रस्तांच्या मताशी मी सहमत असुन केंद्र सरकारच्या धोरणानुसार प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावू व राज्य सरकारने प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नावर लक्ष घालावे अशी मागणी अहीर यांनी केली.
याप्रसंगी हंसराज अहीर म्हणाले की पुनर्वसन तसेच प्रकल्पग्रस्त व स्थानीक कामगार यांना ज्ञच्ब्स् चे कामगार म्हणुन स्थायी नौकरी शिवाय कोळसा खाण सुरू करण्यास परवानगी देवू नये. केंद्र शासनाच्या नवीन कायद्यानूसार कामगार हा KPCL चा कर्मचारी असनार असेही अहीर म्हणाले, प्रकल्पग्रस्तांनी त्यांचे थकीत वेतन, उर्वरीत शेतजमीन भुसंपादन करने, 50 टक्के शेतजमीन परत करण्याच्या कराराची अंमलबजावनी करने. यावर ही जिल्हाधिकारी यांचेसोबत चर्चा केलीे. यावेळी जिल्हाधिकारी श्री अजय गुल्हाने, उपजिल्हाधिकारी श्री खलाटे जी, श्री नरेंद्र जिवतोडे, श्री प्रशांत घरोटे, प्रविन ठेंगने, संजय ढाकने आदींची उपस्थिती होती.
आधी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन व स्थायी नोकरी द्या नंतर प्रकल्प सुरू करा – माजी खासदार हंसराज अहिर
Advertisements