अभियंता निघाला वीरचा अपहरणकर्ता!

0
3790
Advertisements

प्रतिनिधी/विक्की गुप्ता

घुगूस – शहरातील प्रतिष्ठित नागरिक सन्नी खारकर यांच्या 8 वर्षीय वीर नामक मुलाचे 3 नोव्हेम्बरच्या सायंकाळी एकाने अपहरण केले होते, मात्र दुसऱ्याची दिवशी 12 तासानंतर वीर नागपूर येथील सोनेगाव मध्ये पोलिसांना गवसला.
मात्र त्यानंतर सुरू झाली आरोपीची शोधाशोध, घुगूस येथील डीबी पथकाच्या समोर आरोपीला अटक करण्याचे आवाहन उभे ठाकले होते.
कारण आरोपी हा सीसीटीव्ही मध्ये कैद झाला मात्र कॅमेऱ्यात त्याचा चेहरा गाडी क्रमांक काहीच स्पष्ट नव्हते.
मात्र डीबी पथकातील कर्मचाऱ्यांनी केवळ 48 तासात आरोपीला मोठ्या शिताफीने अटक केली.
आरोपी हा घुगूस येथील ड्रीम लँड सिटी येथील रहिवासी 23 वर्षीय गणेश पिंपलशेंडे, आरोपी हा अभियंता असून त्याच्या परिवाराचे खारकर कुटुंबासोबत जवळीक संबंध होते.
काही वर्षापूर्वी गणेशने एका इसमाला 3 लाख रुपये दिले होते, त्या इसमाने गणेशला नोकरी लावण्याचे आमिष दिले, मात्र ते 3 लाख हे व्याजाने उचलून त्या इसमाला दिल्याने गणेशला वारंवार पैसे घेणाऱ्यांचा त्रास वाढू लागला.
अनेक महिन्यापासून गणेश काही काम मिळेल का याच्या शोधात होता जेणेकरून काम मिळाले तर 3 लाख रुपये परत करू अशी त्याच्या मनात इच्छा होती मात्र पैसे मागणाऱ्यांचा त्रासाने त्याची मनस्थिती बिघडली व त्याने चित्रपटाला शोभेल असा प्लॅन आखला.
सन्नी खारकर यांचा वीर हा एकुलता एक मुलगा असल्याने त्याचे वडील आपल्याला पैसे देणार म्हणून त्याने वीर च अपहरण करण्याचे ठरविले, परंतु समोर काय घडणार याची गणेशला फुसटशी कल्पना सुद्धा नव्हती.
त्याने वीर ला तुझ्या आईबाबांचा अपघात झाला आपल्याला तात्काळ नागपूर निघावे लागणार असे सांगून वीर ला दुचाकीवर बसविले.
विशेष म्हणजे गणेशने या दरम्यान वीर ने ओळखू नये यासाठी हेल्मेट घातला होता, नागपूर येथे एके ठिकाणी दोघे राहिले, गणेशने वीर ला त्रास न देता त्याला जेवण दिले व हेल्मेट घालूनच गणेश झोपी गेला.
मात्र सोशल मीडियावर वीर च्या अपहरणाची बातमी वेगाने पसरल्याने गणेश ला आपल्या कृत्याबद्दल वाईट वाटले, काही पैशासाठी आपण 8 वर्षीय बालकाला असे उचलून पैश्याची मागणी करणे त्याला पचले नाही व दुसऱ्या दिवशी सकाळी गणेशने वीर ला सोनेगाव येथे सोडले.
या घटनाक्रमात जी दुचाकी गणेशने वापरली ती त्याच्या मित्राची होती, घुगूस डीबी पथकातील कर्मचाऱ्याने शहरात ती महागडी दुचाकी कुणाकडे आहे याचा शोध लावत ते आरोपीपर्यँत पोहचले व केवळ 48 तासात त्यांनी अपहरणाचा तपास पूर्णपणे उलगडला.
वाहन क्रमांक mh34 ax 1274 ला पोलिसांनी ताब्यात घेत आरोपी गणेशला अटक केली, गणेशने आपणच गुन्हा केल्याची कबुली सुद्धा दिली आहे.
48 तासात अपहरणाचे कोडे उलगडणारे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी शिलवंत नांदेडकर, घुगूस पोलीस निरीक्षक राहुल गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक नागलोन, पथकातील गौरीशंकर आमटे, सुधीर मत्ते, सचिन बोरकर, निलेश तुमसरे, रणजित बुरसे, सचिन ढोहे व नितीन मराठे यांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावली.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here