Advertisements
ताज्या बातम्या – राज्यात लॉकडाउन लागल्याने मार्चनंतर ऑनलाईन वर्ग सुरू करण्यात आले होते.
पूर्ण उन्हाळा व सण उत्सवाच्या दिवशी सुद्धा हे ऑनलाईन वर्ग असेच सुरू होते.
कोरोनाच्या प्रादुर्भावाने राज्यात अभ्यासक्रमाला उशीर झाला आल्याने यंदा दिवाळीत सुट्ट्या मिळणार अशी पालकवर्गाना आशा होती मात्र तसे काही झाले नाही, शासनाद्वारे काढण्यात आलेल्या परिपत्रकात यंदाची दिवाळीची सुट्टी फक्त 5 दिवसांची असणार आहे,
ही सुट्टी 12 ते 16 नोव्हेम्बरच्या कालावधीसाठी ऑनलाईन वर्गांना लागू असणार आहे.
म्हणजे या 5 ऑनलाईन वर्ग शिक्षणाला काही प्रमाणात ब्रेक लागले मात्र दिवाळीची सुट्टी हळूहळू कमी करण्याचा डाव शासनाद्वारे सुरू आहे असा आरोप सुद्धा पालकवर्गानी केला आहे.