ताज्या घडामोडी – राज्यात यंदाच्या दिवाळीत फटाक्यांवर बंदी लागण्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहे.
कारण राज्यातील बहुतांश ठिकाणी वायू प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे, त्या प्रदूषणाचा थेट परिणाम कोरोना रुग्णावर व्हायला नको, यासाठी आरोग्य विभाग फटाकेमुक्त दिवाळी साठी आग्रही आहे.
तसा प्रस्ताव सुद्धा आरोग्य विभागाने तयार केला आहे पुढच्या कॅबिनेट बैठकीत फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्यासंदर्भात निर्णय होणार असल्याची माहिती टोपे यांनी दिली आहे.
दिवाळी मध्ये फटाके फोडल्याने प्रदूषणात वाढ होते, आधीच राज्यात प्रदूषणामध्ये वाढ झाली आहे, त्या प्रदूषणाने श्वसनाचे आजार होण्याची शक्यता वाढलेली आहे.
कोरोना संकट वाढल्याने यंदा ची दिवाळी फटाकेमुक्त राहणार या साठी आरोग्यमंत्री टोपे हे आग्रही आहे.
आधीच राजस्थान, सिक्कीम व ओडिशा राज्यात सरकारने फटाक्यांवर बंदी आणली आहे.
महाराष्ट्रात यंदा फटाक्यांवर बंदी?
Advertisements