चंद्रपुरात शिक्षणाचा ऑनलाईन खेळ

0
387
Advertisements

चंद्रपूर – बाहेर देशातून कोरोना विषाणूचं आगमन आणि देशाची संपूर्ण वाट लागली.
शाळा, कॉलेज, उद्योग, रोजगार सर्व ठप्प झाले इतकेच नव्हे तर कधी न थांबणारे रेल्वेचे चाक सुद्धा पूर्णपणे थांबल्या गेले.
आजपर्यंत हजारो नागरिक या विषाणूने मृत्युमुखी पडले.
मागील 7 महिन्याची परिस्थिती चिंताजनक होती, हजारो मजूर पायी आपल्या घरी गेले, सरकारने सुद्धा त्यांची काही मदत केली नाही.
आज 7 महिन्यानंतर परिस्थिती पूर्व पदावर येत आहे मात्र या सर्वात शिक्षण थांबले, ऑफलाईन शिक्षण आता ऑनलाईन झाले मात्र या शिक्षणाचा फायदा विद्यार्थ्यांना होत आहे का?
शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या घरची परिस्थिती सध्या काय आहे? याचा कुणी विचार केला आहे काय? संस्थाचालक त्यांना नियमित वेतन देत आहे का?
असे अनेक प्रश्न सध्या उदभवले आहे.
ऑनलाईन शिक्षण सुरू करून विद्यार्थ्यांकडून शुल्क वसुलण्याचे प्रकार कॉन्व्हेंट, विद्यालय यांनी सुरू केले आहे.
ऑफलाईन शिक्षणात सकाळी 8 ते 12 नंतर 12 ते 5 असे वर्ग चालायचे मात्र ऑनलाईन शिक्षणाने पूर्ण स्वरूप बदलले.
संस्थाचालक पालक वर्गाकडून शुल्क वसूल करत आहे, मात्र या ऑनलाईन शिक्षणात संस्थाचालकांना मनस्ताप सहन करावा लागत नाही.
वीज बिल कमी झाले, मात्र विद्यार्थ्यांचे बिल वाढायला लागले.
ऑनलाईन शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना मोबाईल डेटा रिचार्ज करावा लागत आहे, परंतु तो डेटा पूर्ण क्लास होत पर्यंत संपून जात आहे.
कधी नेट प्रॉब्लेम आवाज न येणे अश्या अनेक तक्रारी पालकवर्गाकडून होत आहे, यावर संस्थाचालकांचे लक्ष नाही, त्यांना फक्त शुल्क हवे.
हे तर झालं विद्यार्थ्यांचं खाजगी कॉन्व्हेंट व अभियांत्रिकी महाविद्यालयातील शिक्षकांना वेतन मिळत आहे का? याच उत्तर नाही, काहींना चक्क 5 ते 6 महिन्यापासून शिक्षकांना वेतन नाही, ज्यांना वेतन मिळत आहे ते सुद्धा अर्धवटच.
शिक्षणसंस्था जेव्हा सुरू असतात त्यावेळी मिळणारा पैसे कुठे हे चालकवर्ग गुंतवणूक करतात? शिक्षकांना व कर्मचाऱ्यांना या परिस्थितीत वेतन देण्याची वेळ आली तर अर्धवट वेतन देत गप्प रहायला सांगतात अन्यथा कामावरून कमी करण्याची धमकीचं देऊन संस्थाचालक मोकळे होतात.
यंदाचं हे संस्थाचालक यांचं आहे त्यांनी स्वतःची मानसिकता तयार करून शिक्षक व कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी अंधारात ठेवण्याचा बेत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here