चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील व शहरातील भाजपची जम्बो कार्यकारणी घोषित करण्यात आली, भाजप जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे व महानगर अध्यक्ष डॉ गुलवाडे यांनी आपलिया कार्यकारणी जाहीर केली व त्यामध्ये अनेकांना संधी दिली असून महिला आघाडीची जिल्ह्यातील जबाबदारी अलका आत्राम यांना देण्यात आली.
भाजप महिला आघाडी महानगर अध्यक्ष पदी माजी महापौर नगरसेवक अंजली घोटेकर यांना संघटनात्मक जबाबदारी सोपविण्यात आली.
मागील अनेक वर्षांपासून अंजली घोटेकर ह्या भाजपमध्ये सक्रिय आहे, भाजप पक्षात संघटनात्मक बांधणी मध्ये त्यांचा महत्वाचा वाटा आहे.
आक्रमक नेतृत्व म्हणून त्यांची वेगळीच ओळख चंद्रपूर जिल्ह्यात आहे.
अनेक महिलांना त्यांनी न्याय दिला आहे, नागरिकांच्या समस्येवर तात्काळ निराकरण करण्यात त्यांचं नाव आहे.
भाजपने त्यांना महिला आघाडी महानगरची कमान दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही.