दालमिया सिमेंटच्या जुन्या कामगारांना न्याय मिळवून देणार

0
269
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुक्यातील मुरली ऍग्रो सिमेंट कंपनी(दालमिया)येथे नवीन व जुने कामगार असा संघर्ष सुरू आहे.हा संघर्ष मिटविण्यासाठी व परिसरातील कामगारांना न्याय मिळवुन देण्यासाठी कामगार संघटनेची स्थापन करण्याची घोषणा आमदार सुभाष धोटे यांनी 4 नोव्हेंबर रोजी दालमिया सिमेंट गेटवर आयोजित कामगारांच्या सभेत केली.मुरली सिमेंटच्या पाया उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या जुन्या 305 व असंघटित कामगार म्हणून काम करीत असलेल्या जुन्या कामगारांना कामावर घेतल्यानंतर सिमेंट कंपनीत उर्वरित शिल्लक जागांसाठी स्थानिक कामगारांना व युवकांना संधी देण्याकरिता प्रयत्न करणार तसेच कामगार संघटना स्थापन करण्याबाबत पालकमंत्री विजय वडेट्टीवार व खासदार बाळू धानोरकर यांनीही अनुकूलता दर्शविली असून लवकरच कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी संघटनेची स्थापना करून कामगारांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही आमदार सुभाष धोटे यांनी म्हटले आहे.यावेळी मंचावर इंटकचे दास,पंचायत समिती सभापती रूपाली तोडासे,उपसभापती सिंधूताई आस्वले,माजी पं.स.सभापती श्याम रणदिवे,माजी जि.प.सदस्य उत्तम पेचे,चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विजय बावणे,राजूरा पं.स.सदस्य रामदास पुसाम,बिबीचे उपसरपंच आशिष देरकर,राजाबाबू गलगट,गडचांदूर न.प.गटनेता विक्रम येरणे,नगरसेवक राहुल उमरे,अरविंद मेश्राम,युकाँचे जिल्हा महासचिव मिलींद ताकसांडे,प्रकाश मोहुर्ले यांच्यासह नारंडा, वनोजा,कढोली,अंतरगाव,वनसडी व परिसरातील गावातील कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here