प्रतिनिधी/गणेश लोंढे
गडचांदूर – संपूर्ण जगात कोरोना महामारीचा उद्रेक झाल्यावर नागरिकांना सोशल डिस्टनसिंग, मास्क व सॅनिटायझरचा नियमित वापर करण्याची सरकारद्वारे सक्ती करण्यात आली.
आता तर शासकीय असो की खाजगी रुग्णालय डॉक्टर, व कर्मचारी मास्क, सॅनिटायझर चा नियमित वापर करीत नागरिकांना सुद्धा मास्कचा वापर करायला सांगतात त्यानंतर रुग्णाची तपासणी करतात.
मात्र या सर्व गोष्टींला गडचांदूर ग्रामीण रुग्णालय अपवाद ठरला आहे.
या रुग्णालयात डॉ व कर्मचाऱ्यांकडून तपासणी करण्यासाठी आलेल्या नागरिकांनी मास्क घातल्याशिवाय त्यांची तपासणी सुद्धा करीत नाही, परंतु कर्मचारी स्वतः मास्क घालत नाही हे विशेष.
News34 चे प्रतिनिधी यांनी याबद्दल जेव्हा कर्मचाऱ्यांना मास्क बद्दल विचारणा केली असता त्यांनी तात्काळ मास्क घालण्यास सुरुवात केली.
म्हणजेच लोकांस सांगे ब्रह्मज्ञान व स्वतः कोरडे पाषाण अशी परिस्थिती गडचांदूर ग्रामीण रुग्णालयाची आहे.