प्रतिनिधी/घुगूस
घुगूस – शहरात एका अल्पवयीन मुलीला दारू पाजून पिता पुत्र द्वारा अत्याचार करण्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
पीडित अल्पवयीन मुलगी ही गडचिरोली जिल्ह्यातील आहे, आरोपी 66 वर्षीय महादेव टिपले व 33 वर्षीय स्वप्नील टिपले यांनी त्या मुलीला घरकाम करण्यासाठी आणले होते.
आरोपी महादेव टिपले यांच्या पत्नीची तब्येत मागील अनेक दिवसांपासून बरी नसल्याने पत्नीद्वारे कामे होत नसल्याने त्यांनी पीडित मुलीला 3 हजार रुपये महिना देण्याचे आमिष देत 2 महिण्याकरिता घुगूस येथे आणले होते.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार हा मागील 1 महिन्यापासून सतत सुरू होता, 1 महिना घरी हे दोन्ही आरोपी व्यवस्थित होते मात्र त्यानंतर त्यांनी आपलं खर रूप दाखविले.
अल्पवयीन मुलीला दारू पाजून पिता पुत्रांनी तिच्यावर अत्याचार केला, याबाबत पीडित मुलीने आपल्या आई वडिलांना घडलेला प्रकार सांगितला त्यानंतर मुलीच्या आई वडीलाने तात्काळ याबाबत पोलीस स्टेशनला तक्रार दिली.
पोलिसांनी 376 व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीना अटक केली.
पुढील तपास घुगूस पोलीस करीत आहे.