गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
गडचांदूर शहरात विकास कामांच्या श्रेणीत नाली बांधकामाला सुरुवात होणार आहे.यासाठी आवश्यक ती प्रक्रिया पार पडली असून विकासाची धडपड असलेल्या काही सत्ताधाऱ्यांनी आपल्याच नातेवाईकांना सदरची कामे मिळवून देण्यासाठीचे पराक्रम केल्याचे दिसत आहे.हे कंत्राटदार नालीचे बांधकाम करणार असल्याची चर्चा ऐकायला मिळत असून काही ठिकाणी कामाचे उदघाटन सुद्धा झाले असून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महात्मा ज्योतिबा फुले चौकापर्यंत नाली बांधकाम होणार आहे.मात्र हा रोड जिल्हापरिषदेच्या मालकीचा फार जुना व शहरातील मुख्य रस्ता आहे.याठिकाणी कित्येक नागरिकांचे अतिक्रमण असल्याने सध्या रस्ता मोक्यावर अरुंद आहे.जर अशा स्थितीत नालीचे बांधकाम झाले तर नागरिकांना वहिवाटीसाठी मोठ्याप्रमाणात अडथळा निर्माण होणार हे मात्र नक्की.याकरीता भविष्यात कुठल्याही प्रकारचा वादविवाद उपस्थित होण्यापूर्वी सदर रस्त्याचे भूमी अभिलेख कार्यालय,जिल्हापरिषदेच्या अधिकाऱ्या समक्ष मोजमापानंतरच नालीचे बांधकाम करावे अशी मागणी जोर धरत असून आता मात्र संबंधितांकडून काय घडते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.यासर्व बाबींसह शहरात सुरू होणार्या नाली कामांच्या दर्जाकडे News34 करडी नजर असणार हे मात्र विशेष.
महापुरूषांच्या मार्गावरील नालीचे बांधकाम रोड मोजणी करून करा
Advertisements