घुगूसचा वीर नागपूरमध्ये गवसला

0
3644
Advertisements

प्रतिनिधी/विक्की गुप्ता
घुगूस – 3 नोव्हेंबरला सायंकाळी 5 च्या सुमारास वीर खारकर हा 8 वर्षाचा मुलगा खेळत असतांना अचानक बेपत्ता झाला होता.
घुगूस शहरातील प्रतिष्ठित नागरिक सन्नी खारकर यांचा वीर मुलगा होता.
अचानक बेपत्ता झाल्याने परिवारातील सदस्यांनी त्याचा शोध घेतला परंतु तो कुठेही आढळून आला नाही.
मात्र 4 नोव्हेम्बरला वीर नागपूर पोलिसांना मिळाला, मिळालेल्या माहितीनुसार वीर खेळत असतांना एका दुचाकीस्वाराने त्याला आपल्या गाडीवर बसवून नेले होते, याबाबत हे दृष्य सीसीटीव्ही मध्ये कैद झाले, वीर ला दुचाकीवर नागपूर पर्यंत नेण्यात आले.
मात्र समाज माध्यमांवर वीर हरवला याबाबत पोस्ट झळकली होती.

अज्ञात आरोपी सुद्धा केलेल्या कृत्याने घाबरून गेला असावा, आपण पोलिसांच्या हाती लागणार अश्या भीतीने अज्ञात आरोपीने त्याला सोनेगाव बस स्टॉप ला सोडून मी लगेच येतो असे म्हणून फरार झाला.
खूप वेळ निघून गेल्याने आरोपी आला नाही मात्र वीर ला आपल्या घरचा मोबाईल क्रमांक आठवण असल्याने परिसरातील एका महिलेला घडलेली आपबीती सांगत त्यांनी पोलीस स्टेशन गाठले व तिथून घरी फोन लावला असता, बाबा मी नागपूर मध्ये आहो असे म्हणत घरच्या व्यक्तींनी सुटकेचा निश्वास सोडला.
अज्ञात आरोपी हा ओळखीचा असावा नाहीतर कुणीही अनोळखी व्यक्तीच्या गाडीवर बसणार नाही, वीर ला घरचा नंबर लक्षात असणे व तात्काळ आरोपी निघून गेल्याने दाखविलेली तत्परता त्यामुळे आज वीर मिळाला.

Advertisements

हे कृत्य सूड भावनेने केले असावे असे तर्क आता लावण्यात येत आहे, आज वीर हा अपहरणाने वाचला, नागरिकानो मुलांची काळजी घ्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here