वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

0
391
Advertisements

चंद्रपूर – : चंद्रपूर-नागपूर महामार्गावर येनसा गावानजीक अज्ञात वाहनाच्या धडकेने एका बिबट्याचा मृत्यू झालाय. ही घटना रात्री दहा वाजताच्या सुमारास घडली. ही धडक एवढी जबरदस्त होती की बिबट्या जागीच ठार झाला. त्याच्या जबड्याला जबर दुखापत झाली. रक्ताच्या थारोळ्यात तो रस्त्याच्या कडेला पडून असलेला लोकांना दिसला. गावकऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन वनविभागाला कळवले. हा महामार्ग वर्दळीचा असून ताडोबाच्या बफर क्षेत्रातून बाहेर पडण्यासाठी तो पार करून जावे लागते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here