8 वर्षीय वीर बेपत्ता

0
3304
Advertisements

प्रतिनिधी/विक्की गुप्ता

घुगूस – घुगूस शहरातील प्रतिष्ठित नागरिक सन्नी खारकर यांचा 8 वर्षीय मुलगा वीर खारकर आज सायंकाळी घराजवळ खेळत होता मात्र तो घरी न परतल्याने घरच्या सदस्यांनी त्याची शोधाशोध सुरू केली मात्र वीर चा पत्ता लागला नाही.
वीर हा आरा मशीन जवळ वार्ड नंबर 3 येथे खेळत होता मात्र त्यानंतर तो घरी परतला नाही.
सन्नी खारकर यांनी याची तक्रार घुगूस पोलीस स्टेशनला केली मात्र 4 तास उलटल्याने वीर चा पत्ता न लागल्याने घरच्या सदस्यांनी व शहरातील नागरिक पोलीस स्टेशनजवळ पोहचले व तात्काळ वीर चा शोध लावण्याची मागणी केली.
वीर हा कुणाला आढळल्यास तात्काळ घुगूस पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here