समस्येचं माहेरघर कोरपना तालुका

0
236
Advertisements

प्रतिनिधी/गणेश लोंढे

कोरपना – जिल्ह्यातील कोरपना तालुका हा अनेक वर्षापासून विविध समस्यांनी ग्रस्त आहे, त्या सर्व समस्येचा आढावा आमच्या प्रतिनिधीने घेतला आहे एक नजर त्या सर्व समस्येवर..

Advertisements

*आरोग्याची समस्या*

कोरपना तालुक्याची निर्मिती होऊन तीस वर्षाचा काळ लोटला आणि येथे तीन सिमेंट कम्पनीची निर्मिती झाली येथील भूमीपुत्रांनी जमीन,पाणी,श्रम हे सर्व येथे उद्योग निर्मिती करिता दिले मात्र आजच्या परिस्थितीला याच सिमेंट प्रकल्पाचा धूळ डस्ट येथे नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असून अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे ज्यात गडचांदूर ग्रामीण रुग्णालय आहे मात्र रुग्ण आहे मात्र तिथे आरोग्य चाचणीच्या माशिणीची उपलब्धता नसल्याने रेफर टू चंद्रपूर ही वास्तविकता पाहता तालुक्यात गडचांदूर सारख्या शहरात उपजिल्हा रुग्णालयाची गरज आहे आणि ही मागणी अनेक वर्षांपासून आहे मात्र उपजिल्हा रुग्णालयाचा श्रीगणेशा होईल तेव्हाच खरे आणि येथील रुग्णाला येथेच उपचार मिळेल तेव्हाच खरे…

*सुसज्ज बसस्थानक*

कोरपना तालुका हा चंद्रपूर जिल्ह्याचा अंतिम टोकावर असून तेलंगणा आंधरप्रदेश राज्याची सीमा काही अंतरावच लागलेली आहे येथिल परिस्थिती पाहता येथे सुसज्ज अशा बसस्थानकाची तालुक्यात गरज आहे जिवती सारख्या अतिदुर्गम तालुक्यातील नागरिकांना गडचांदूर मार्गच पार करून प्रवास करावा लागतो गडचांदूर मध्यभागी असल्याने आंधरप्रदेश मधून आदीलाबाद ते चंद्रपूर च्या एस. टी. वाहन,पालगाव – चंद्रपूर,गडचांदूर – चंद्रपूर,जिवती – राजुरा ,कोरपना – राजुरा या प्रवाशाच्या सेवेकरिता असलेल्या एस टी महार्गावर थांबतात मात्र येथील येथील सुसज्ज बसस्थानकच स्वप्न दिवा स्वप्न ठरेल का हा प्रश्न येथील नागरिक विचारत आहे.

*रेल्वे प्रवासाची प्रतीक्षा*

तालुक्यात परराज्यातून कामासाठी आलेल्या कामगारांची मोठी संख्या आहे तसेच येथील नागरिकांना नागपूर, मुबई अशा मोठ्या शहरांचा रेल्वेने प्रवास करायचा असेल तर गडचांदूर येथून ५० किमी चे एस.टी. ने अंतर गाठून रेल्वे पकडावी लागते
सिमेंट उद्योगासाठी प्रसिद्ध असलेल्या गडचांदूरतील त्याकाळी सिमेंट उद्योगाच्या मालवाहतुकीसाठी रेल्वे मार्ग उभरण्यात आला परंतु दोन दशकाच्या वर कालावधी लोटून सुद्धा या मार्गावर प्रवासी रेल्वेला सुरवात झाली नाही त्यामुळे या भागातील नागरिकांचे रेल्वेत बसून प्रवास करण्याचे स्वप्न अपुरेच राहिले आहे.

*अपुरी सिंचन व्यवस्था*

तालुक्यात अमलनाला धरण,तसेच पकडी गुडडम असे दोन मोठे धरण आहेत मात्र शेतकऱ्यांना मुबलक सिंचन पाणी पुरवठा या सोईसुविधा आजही भेडसावत आहे
या तालुक्याला पांढऱ्या सोन्याची खान समजल्या जाते या भागात एखादा सुतगीरणीचा अशी मागणी कित्येक वर्षांपासून होत आहे मात्र त्याकडे सतत दुर्लक्ष होत आहे फक्त पोकळ आश्वासने देऊन येथील नेते जनतेची दिशाभूल करीत आहे तालुक्यात कापसावर प्रक्रिया करणारे उद्योग आवश्यक आहे जेणेकरून कापसाची मागणी वाढून चांगला भाव मिळेल व भूमीपुत्रांच्या हाताला मिळेल.

*स्थानिक युवकांची रोजगारासाठी भटकंती*

विविध उद्योगाने नटलेल्या या शहरात युवकांची स्थिती मात्र दयनीय आहे येथील युवकांना रोजगारासाठी इतरात्र भटकंती करावी लागत आहे काही दिवसांपूर्वी विविध प्रकल्पात रोजगार भरतीसाठी पडताळणी करण्यात आली यामध्ये स्थानिक शहरातील स्थानिक तरुण बेरोजगारांना हाताला काम नसल्याचा सूर उमटला दररोज या भागात परप्रांतीय येतात त्यामुळे या भागातील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे बेरोजगारीमुळे अवैद्य धंद्याला कमालीचे उधाण आले आहे गडचांदूर सारख्या शहरात जागा कमी आणि लोकसंख्या अधिक अशी स्थिती आहे याचा नाहक त्रास स्थानिकांना होत आहे परराज्यातून कामासाठी आलेल्या लोकांमुळे स्थानिकांना उद्योजकांकडून डावलण्यात येत आहे त्यामुळे येथील स्थानिक तरुणांना रोजगारासाठी भटकंती करावी लागत आहे.

*रस्ते आणि वाहतूक व्यवस्था*

तालुक्यातील तीन सिमेंट उद्योगामुळे येथे मोठ्या मोठ्या जड वाहनाची वर्दळ असते
राजुरा ते आदीलाबाद प्र. राज्यमार्ग क्र.१० चे राष्ट्रीय महामार्ग क्र.३५३ मध्ये पतीवर्तन करण्यात आले याला ३ वर्षाचा काळ लोटत आहे या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात येईल अशा आशा लोकप्रतिनिधी कडून दाखविण्यात आल्या मात्र आजपर्यंत काम सुरू न झाल्याने नागरीकांना मोठं मोठ्या वाहनसमोर जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे राष्ट्रीय महामार्ग जो कगदारच आहे एकदाचे चौपदरीकन होणार केव्हा हा प्रश्न येथील नागरिक विचारत आहे कारण प्रत्येक वर्षी या सिमेंट उद्योगातील जड वाहनाने रस्त्यावर गड्डे पडून रस्त्यांची पार वाट लागत असते त्यामळे येथील अपघात ही जणू रोजचीच मालिका होऊन बसली आहे सार्वजनिक बांधकाम विभाग दरवर्षी तेच खड्डे बुजविण्यात धन्यता मानत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here