चिमूर – 2 नोव्हेंबर ला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत देशी दारुसह 4 लाख 74 हजारांची दारू पकडण्यात आली.
गुप्त माहितीच्या आधारे नांदा- खडसंगी रोडने झायलो वाहन क्रमांक एमएच 31 सीएम 0221 या वाहनातून अवैध दारू वाहतूक होत असल्याची खात्रीपूर्वक माहिती मिळाली असता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सापळा रचून मिनझरी गावाजवळ सदर वाहनाला थांबवून विचारपूस करीत वाहनांची तपासणी केली असता वाहनात देशी दारूचे 30 बॉक्स आढळून आले.
या कारवाईत वाहन चालक अक्षय शेगावकर यांचे विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्ह्याची नोंद करून आरोपीस अटक केली.
देशी दारुसहित एकूण 4 लाख 74 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरची कारवाई उत्पादन शुल्क विभाग भरारी पथकाचे अमित क्षीरसागर , चेतन अवचट, सुदर्शन राखूनडे व जगन पट्टलवार यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत 4 लाख 74 हजारांची अवैध दारू जप्त
Advertisements