एक पणती आमची, प्रा फाऊंडेशनच्या उपक्रमाला देवांशुची साथ

0
247
Advertisements

चंद्रपूर – पुण्यातील प्रा फाऊंडेशनच्या वतीने दिव्यांग मुलांनी तयार केलेल्या पणत्या विक्रीचा आगळावेगळा उपक्रम चंद्रपुरातील देवांशु पुढे नेत आहे.
दिवाळीच्या या उत्साहात प्रा फाऊंडेशनने दिव्यांग मुलांच्या हस्ते तयार केलेल्या पणत्या बाजारात उपलब्ध करून देत आहे.
या उपक्रमाला चंद्रपुरातील तबलावादक देवांशु याने एक पणती आमची असा उपक्रम सुरू करीत 50 हजार पणत्या विक्रीचा शुभारंभ केला आहे.
या उपक्रमात देवांशुची आई मेघना व वडील राकेश शिंगरू सहभागी झाले आहे.
दिवाळीच्या या प्रकाशमय सणात अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या त्या पणत्या नागरिकांनी विकत घ्यावा अशी विनंती शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here