चौकशीच्या आदेशासाठी 7 दिवस उपोषण,आता चौकशी सुरू करण्यासाठी कीती दिवस बसू ? “सांगा”

0
327
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
गडचांदूर नगरपरिषदेत झालेल्या घनकचरा घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी,दोषी आढळल्यास अधिकारी,कर्मचार्‍यांवर कायदेशीर कारवाई करावी तसेच अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी घनकचरा कंत्राटदारांसोबत संगनमत करून लाखोंचा घोटाळा केल्याचा आरोप करत सदर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून कंत्राटदाराचा परवाना काळ्या यादीत टाकावा या मागणीला घेऊन “भीम आर्मी” जिल्हा उपाध्यक्ष मदन बोरकर यांनी गेल्या सप्टेंबर महिन्यात सलग 7 दिवस गडचांदूर नगरपरिषदपुढे अन्नत्याग उपोषण केले होते.या कालावधीत अनेक घडामोडी घडल्या नंतर अखेर सातव्या दिवशी शासनाला जाग आली आणि जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश पत्र दिले.उपविभागिय अधिकारी राजूरा यांना चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले.मात्र या आदेशाला 20 ते 25 दिवस लोटूनही कारवाई काही सुरू न झाल्याने “घनकचरा व्यवस्थापन घोटाळा चौकशीच्या आदेश पत्रासाठी 7 दिवस उपोषण केले,आता सांगा चौकशी सुरु करायला किती दिवस बसू” असा प्रश्न विचारला आहे.
दरम्यान 2 नोव्हेंबर रोजी चंद्रपूर जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख प्रशांत कदम हे गडचांदूर येथे आले असता बोरकर यांनी त्यांची भेट घेऊन येथील घनकचरा व्यवस्थापन घोटाळ्या संबंधी घडलेल्या घडामोडींची सविस्तर माहिती देत सध्या चौकशी थंड बस्त्यात असून सदर प्रकरणी चौकशीला गती मिळावी व दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी निवेदनातून केली आहे.यावेळी शिवसेनेचे नगरसेवक तथा गटनेता सागर ठाकूरवार,नगरसेवक तथा शिवसेना उपजिल्हा प्रमुख धनंजय छाजेड,नगरसेवक शेख सरवर यांच्या सह इतरांची प्रामुख्याने उपस्थिती होती.आता चौकशी संबंधी बोरकर यांच्या मागणीला कितपत यश प्राप्त होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here