गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुक्यात सर्वात मोठे शहर गडचांदूर येथे कोरोना बाधीतांची संख्या लक्षात घेता नागरिकांत प्रचंड चिंतेचे वातावरण पसरले आहे.या मागचे मुख्य कारण म्हणजे स्थानिक माणिकगड सिमेंट कंपनीची लापरवाही आणि स्थानिक नगरपरिषद प्रशासनाचा हलगर्जीपणा…! कोरोनाचा पार्श्वभूमीवर कंपनीने जेव्हा कामाला सुरुवात केली त्यावेळी या परिसरामध्ये अनेक बाहेरचे कामगर,एम्प्लॉईज़ व कर्मचारी आले.अनेकांना लपवून ठेवण्यात आले. नियमाप्रमाणे त्यांना कॉरंटाईन करणे गरजेचे होते मात्र असे झाले नाही.माईन्स मध्ये देखील 20 ते 25 युपी,बिहारच्या कामगारांना आणून ठेवण्यात आले होते. विविध कामांसाठी तसेच वस्तू खरेदी करण्यासाठी हे लोक बिनधास्तपणे गावांमध्ये ये-जा करीत होते.कंपनीतील एका स्थानिक एम्प्लॉईज़ मजूराच्या वडीलाचा मृत्यू झाला.व्यापाऱ्यांचा मृत्यू कोरोनाने झाला याला कारणीभूत माणिकगड सिमेंट कंपनी असून यांच्या निष्काळजीने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व शासन कोविड निर्देशांचे पालन कंपनीने केले नाही.शिफ्ट नंतर मजुरांना मार्केट किंवा घरांकडे जाण्याची मुभा होती. त्याचबरोबर कंपनीच्या आत अनेक रूग्ण बाहेरून आले आहे.त्यामुळे प्रदुषण पर्यावरण याचबरोबर बाहेरच्या मजुरांचे अतिरेक,शासन नियमांची ऐशीतैशी करत माणिकगड सिमेंट कंपनीच्या निष्काळजी व लापरवाहीपणा आणि यासर्व गंभीर बाबींवर स्थानिक प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष,यामुळे गडचांदूर व परिसरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे आरोप करण्यात येत आहे.शहरातील वाढत्या कोरोना रुग्णांविषयी News34 ने काही प्रतिष्ठितांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी अशाप्रकारे रोखठोक मत व्यक्त केले.
———-//——-
*”गडचांदूर शहरात आज कोरोना बाधीतांची जी संख्या आहे याला कंपनीच कारणीभूत असून बंगाली कॅम्प,एरिगेशन कॉलीनी व इतर ठिकाणी जे कोरोना बाधीत सापडले आहे यातील जास्त प्रमाणात मजूर व कामगारांच्या कुटुंबातच बाधीत झालेले आहे.यावरून स्पष्ट होते की कंपनीने कोरोना नियमांचे उल्लंघन केले.ही बाब अत्यंत गंभीर असून यामुळे गडचांदूर शहराला मोठा धोका निर्माण झाला आहे.एकिकडे जवळच्या अंबुजा सिमेंट कंपनीने बाहेरच्या कामगारांना आणून आतमध्येच जेवणाची व राहण्याची व आरोग्याची व्यवस्था केली एकाही मजुराला प्लाँटच्या बाहेर निघू दिले नाही.मात्र माणिकगड सिमेंट कंपनीने याच्या उलट काम केलेले आहे.शिफ्ट झाल्यावर घरी जाण्याची व मजूरांना बाजारात जाण्याची छूट होती.त्यामुळे गडचांदूरात संक्रमितांची संख्या वाढली याला जबाबदार माणिकगड सिमेंट कंपनीच आहे.आणि याकडे नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी व संबंधित अधिकारी यांचे दुर्लक्ष झाल्याने कंपनीवर नियंत्रण केले नाही म्हणून हे ही तेवढेच जबाबदार आहे यात दुमत नाही.नगरपरिषद प्रशासनाने सदर कंपनी गावाला लागून असल्याने शहरात मजुरांचे येणेजाणे होत असताना पाहिजे तसे नियंत्रण ठेवले नाही त्यामुळे मा.जिल्हाधिकारी यांच्या आपत्ती व्यवस्थापन निर्देशाचे सर्रास उल्लंघन झालेले आहे.अनेक बाहेरच्या मजुरांना आतमध्ये ठेवून बाहेर जाण्याची मुभा दिली जात होती तसेच नगरपरिषद प्रशासनाचा निष्काळजीपणा हे फलीत असून आज रोजी संपूर्ण माणिकगड सिमेंट कंपनी एम्प्लॉईज़ व गडचांदूरकरात दहशतीचे वातावरण आहे.याला नगरपरिषद प्रशासनाने तातडीने दखल घेऊन कारवाई करावी,नियमांचे पालन न केल्याबद्दल कंपनीला दोषी ठरविण्यात यावे.”*
*(जनसत्याग्रह संघटना अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सैय्यद आबीद अली)*
————//———–
*”सध्याची कोरोनाची स्थिती पाहता गडचांदूर परिसर माणिकगड सिमेंट कंपनीमध्ये परराज्यातून कामगारांचा लोंढा सुरू झाला.आणि अशा या परिस्थितीत स्थानिक प्रशासन आणि माणिकगड सिमेंट या दोन्हीही याला मोठ्याप्रमाणात जबाबदार आहे.त्यामुळे आमच्या परिवारात कोरोनाची एक थांबलेली गती पुन्हा भरपूर वेगाने वाढत आहे.याकरीता यावर सर्वश्री जबाबदार स्थानिक प्रशासन असून या प्रशासनाने त्यच्यावर वेळीच जर अंकुश घातला नाही तर येणाऱ्या काळात पुन्हा कोरोनाचे महा संकट गडचांदूर व परिसरात उभे झाल्याशिवाय राहणार नाही. यासाठी तातडीने स्थानिक प्रशासनाने उपाययोजना करावी अन्यथा याविरोधात शिवसेनेच्या वतीने तिव्र आंदोलन उभारण्यात येइल.”*
*(धनंजय छाजेड, नगरसेवक तथा उपजिल्हा प्रमुख शिवसेना गडचांदूर.)*
———//———-
*”कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन युद्धपातळीवर सर्वतोपरीने मदत करत आहे.परंतु स्थानिक प्रशासनाचे खरच याकडे दुर्लक्ष आहे.त्यामुळे यापूर्वी सुद्धा दुर्लक्षामुळे कोरोनाचे रुग्ण आढळले आहे.मात्र आता सुध्दा दुर्लक्ष केले तर रुग्ण वाढण्याचे चाँसेज़ जास्त आहे.परंतु स्थानिक कंपनीच्या अधिकार्यांचा दबाव व मुजोरीमुळे नगरपरिषद प्रशासन यांच्यावर काहीच कारवाई करत नाही त्यामुळे भविष्यात पुन्हा कोरोना रूग्ण वाढायला चाँसेज़ आहे.कोरोनाचे संकट तर आहेच परंतु डस्ट सारखा विषय ज्यामुळे लोकांच्या जीविताला धोका आहे त्याकडे सुद्धा या नगरपरिषद प्रशासनाचे दूर्लक्ष होत आहे.आणि दुर्लक्ष होण्याचे कारण म्हणजे कंपनी सोबत यांची मिलीभगत.यांना लोकांच्या जीवांशी काहीही देणंघेणं नाही यांना फंड मिळते याच्यातच हे खुश असून एकंदरीत म्हणजे कोरोनामुळे स्थानिक प्रशासनाला सुगीचे दिवस आले की काय असेच वाटते आहे.फंड मिळत आहे आणि ते आपल्या मनमर्जीने खर्च करत आहे.आणि यावर कुणाचेही नियंत्रण नाही.यासंबंधी जर कोणी आंदोलन वगैरा करत असेल तर आम्ही आमच्यापरीणे पाठींबा देऊ.”*
*(अरविंद डोहे,भाजप नगरसेवक गडचांदूर.)*
गडचांदूरात कोरोना बाधीत वाढण्या मागे “माणिकगड सिमेंट” जबाबदार
Advertisements