विरुर वनपरिक्षेत्रात वाघाचा हल्ला

0
509
Advertisements

राजुरा,2 नोव्हेंबर –
मध्य चांदा वनविभागातील राजुरा व विरुर वन परिक्षेत्रात आरटी 1 वाघाला जेरबंद केल्यानंतर येथील लोकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला होता. मात्र या घटनेची शाई वाळण्यापूर्वीच पुन्हा एका गाईवर हल्ला करून तिला ठार केले आणि दुसऱ्या गाईंला वाघाने जखमी केले आहे. ही गुरांवर हल्ला करणारी वाघीण असल्याची माहिती असून पुन्हा राजुरा तालुक्यात भीती निर्माण झाली आहे.
आज दिनांक 2 नोव्हेंबरला दुपारी राजुरा वनपरिक्षेत्रातील चूनाळा बीटातील कंपार्टमेंट क्रमांक 158 येथे सातरी येथील नानाजी बोढे यांच्या गाईवर वाघाने हल्ला करून तीला जागीच ठार केले. काल दिनांक 1 नोव्हेंबरला चनाखा येथील कमलेश साळवे यांच्या गाईवर हल्ला करून तिला जखमी केले होते. वनरक्षक शेंडे व पशुपालक यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या प्रकारामुळे ग्रामीण भागात पुन्हा दहशत निर्माण झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here