बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – आ. किशोर जोरगेवार

0
223
Advertisements

चंद्रपूर – कापूस पिकावर पून्हा एकदा बोंडअळीचे आक्रमण झाल्याने कापूस उत्पादक शेतकरी हवालदील झाला आहे. चंद्रपूरातील बहूतांश भागातील कापूस पिकांचे बोंडअळीने मोठे नूकसान केले आहे. आज आमदार किशोर जोरगेवार यांनी थेट शेतक-यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतपीकांची पाहणी केली. यावेळी कापसाचा बोंड अळीमूळे पूणर्ताह खराब झाल्याचे दिसून आले. एकदंरीतच कापूस उत्पादक शेतक-यांचे बोंडअळीने 100 टक्के नुकसान केले असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या सर्व नुकसान ग्रस्त शेतीची पाहणी करून तात्काळ पंचनामे करा अशा सूचना आ. किशोर जोरगेवार यांनी दिल्या आहे. सदर नुकसानाची माहिती कृषीमंत्री यांना देणार असल्याचेही आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी म्हटले आहे.
यावेळी तालुका कृषी अधिकारी ठाकरे, तालुका कृषी सहायक गायकवाड, धानो-याच्या ग्रामसेविका वर्षा मानकर, तलाठी शैलेश दुवावार, प्रभाकर धांडे, गणपत कुडे, अरुन तुराणकर, नंदकिशोर वासाडे, पारस पिंपळकर, जंगलू पाचभाई, राकेश पिंपळकर, प्रविण पिंपळशेंडे, पंकज पूप्ता, मून्ना जोगी, चंद्रकांत खांडेकर आदिंची उपस्थिती होती.
अनियमीत पाऊस आणि सततच्या वातावरणातील बदलामूळे शेतक-यांना दरवर्षी नुकसाणीचा सामना करावा लागत आहे. यंदाही मोठ्या आशेने फुलवलेले शेत बोंडअळी व मावा सारख्या रोगाने नष्ट केले आहे. त्यातच परतीच्या पावसाचाही शेतपीकांना चांगलाच फटका बसला असून तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. त्यामूळे शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. दरम्याण आज आमदार किशोर जोरगेवार यांनी विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण भागांचा दौरा करत नुकसाणग्रस्त शेतीची पाहणी केली. यावेळी आ. जोरगेवार यांनी मारडा, पिपरी. धानोरा गावांना भेट दिली. या सर्व गावातील कापूस पिकांचे जवळपास सारखेच नुकसाण झाले असल्याचे निदर्शनास आले. उगवलेल्या बोंडावरच बोंडअळीने आक्रमण केल्याने बोंडाचे नुकसाण झाले असून वेचणी करणे शेतकर्यांना कठीण झाले आहे.

उत्पादन खर्च प्रचंड वाढत असतांना उत्पादनात होणारी घट शेतक-यांपुढे मोठे संकट आहे. बोंडे तयार होत असतांना अळीचा प्रादुर्भाव झाल्याने या भागातील शेतक-यांचे 100 टक्के नूकसाण झाले आहे. कृषी मंत्री यांची भेट घेऊन त्यांना सदर नुकसाणीबाबत माहिती देणार असल्याचे सांगत या भागातील सर्व्हेक्षण तात्काळ करा अशा सूचना त्यांनी दिल्या.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here