अभाविपची भद्रावती नगर कार्यकारिणी घोषित

0
283
Advertisements

भद्रावती/अब्बास अजानी

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची महत्वपूर्ण बैठक येथील लोकमान्य विद्यालयाच्या सभागृहात पार पाडून त्यात भद्रावती नगराची नूतन कार्यकारिणी घोषित करण्यात आली.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही जगातील सर्वात मोठी संघटना असून गेल्या ७१ वर्षापासून शैक्षणिक परिवार व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. यावर्षी भद्रावती नगरात नूतन अभाविप नगर कार्यकारिणी गठीत करण्यात आली. यावेळी छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला. स्वामी विवेकानंद व देवी सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी अभाविप उद्बोधन जिल्हा संयोजक प्रविण गिलबिले व पुर्व कार्यकर्ते संजयजी पारधे यांनी मार्गदर्शन केले.निवडणूक अधिकारी म्हणून प्रा.परसावार यांनी नूतन कार्यकारिणी घोषित केली. नगरमंत्री म्हणून बाळा प्रशांत भडगरे, नगर सहमंत्री स्वराज पारधे, महाविद्यालय प्रमुख म्हणून दर्शना नागपुरे, महाविद्यालय सहप्रमुख अनुराग शंभरकर,विद्यार्थिनी प्रमुख तनुजा येरणे, क्रीडा प्रमुख मयुर प्रशांत भडगरे, कार्यालय मंत्री प्रियंशू मस्के, सहकार्यालय मंत्री रोहित शेट्टी, सोशल मीडिया प्रमुख संस्कार झाडे, सेवाकार्य प्रमुख राधेय ताठे, सेवाकार्य सहप्रमुख गोपाल पारधे, तंत्र शिक्षण प्रमुख निहाल रेटवार,तंत्र शिक्षण सहप्रमुख चंद्रकांत झाडे, ़कलामंच प्रमुख मोहम्मद कैफ खान व हर्षल भरणे, विकासार्थ विद्यार्थी प्रमुख यश चौधरी, स्वाध्याय मंडळ प्रमुख कुणाल केवटे, आणि सदस्य म्हणून राजेश हजारे, दीपक पारधे व निखिल बावने यांची घोषणा करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश हजारे,संचालन तनुजा येरने व हर्षल भरणे यांनी केले.तर आभार कुणाल केवटे यांनी मानले. नूतन कार्यकारिणीचे शैक्षणिक,सामाजिक सर्व क्षेत्रातून स्वागत व अभिनंदन होत आहे.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here