चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील 8 वीत शिकणाऱ्या एका मुलीने चक्क राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहत जिल्ह्याची दारूबंदी उठविण्यात न यावी यासाठी विनंती केली आहे.
माझे बाबा झिंगुण घरात यावेत हे आदित्य दादांना रुचेल का? मद्यपी वाहन चालकाने निरपराध जनतेला चिरडून जावे किंवा माझ्या तेजस दादाच्या गाडीला धडक मारावी असा विचार केला की अंगावर जणू शहारे येतात.
आपण सर्व राजमाता जिजाऊंचे वंशज आहोत, या दारूने जनतेचे कुटुंब उध्वस्त करणाऱ्या करातून आम्ही कशी काय करणार? असा थेट सवाल त्या चिमुकल्या मुलीने मुख्यमंत्री ठाकरे यांना विचारला आहे, आमच्या जिल्ह्यातील बांधव, माता, भगिनी सुखाने आनंदाने नांदायला हव्या, परंतु आपल्या मंत्री महोदयांचा दारूबंदी उठवायचा अनाठायी आग्रह का? उलट आपण दारूबंदी, धूम्रपान, भ्रष्टाचार या संदर्भात अधिक कडक कायदे बनवून अंमलबजावणी करायला हवी.
1963 ला गडचिरोलीतील आदिवासी बांधवांनी आपल्या परंपरेनुसार अनवाणी पायांनी मुंबईला जाऊन तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांची भेट घेतली होती, यावेळी 6 वर्षांपासून सुरू असलेल्या दारूबंदीच्या आंदोलनाची माहिती सुद्धा देण्यात आली होती, अशी आठवण सुद्धा मुख्यमंत्री ठाकरे यांना त्या पत्रातून करून दिली.
चंद्रपूर जिल्ह्यात 2015 पासून दारूबंदी करण्यात आली, त्यानंतर अवैध दारू मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात आली याचा अर्थ असा नाही की दारूबंदी फेल झाली उलट सरकारने कठोर कायदे अंमलात आणून पूर्णपणे दारूवर निर्बंध आणायला हवे.
मात्र पालकमंत्री वडेट्टीवार यांनी सत्तेवर येताच दारूबंदी लवकर उठवू असा हट्ट धरलेला आहे, मात्र या दारूने किती घरे उध्वस्त झाली याच निदान भान तरी मंत्री वडेट्टीवार यांनी ठेवायला हवं.
मात्र राजकीय नेते आपल्या फायद्यासाठी दारूबंदी उठविण्याच्या मागे लागले आहे.
त्या मुलीच हे पत्र विजयादशमीला लिहण्यात आले होते.
आता त्या पत्रावर मुख्यमंत्री ठाकरे काय उत्तर देतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे.