दारु तस्कारांकडून १३ लाख ५० हजाराचा मुद्देमाल जप्त

0
369
Advertisements

भद्रावती/अब्बास अजानी

भद्रावती पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत दारु तस्करांकडून देशी दारुसह १३ लाख ५० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,दि.३१ डिसेंबर रोजी एम.एच.३४,बी.जी.७०४३ क्रमांकाची पांढ-या रंगाची क्रेटा कार नागपूरवरुन भद्रावती मार्गे चंद्रपूरला जात असून कारमध्ये अवैधरित्या देशी दारु असल्याची गुप्त माहिती भद्रावती पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी भद्रावतीच्या पेट्रोल पंप चौकात महामार्गावर नाकाबंदी करुन सदर कार अडविण्याचा प्रयत्न केला असता कार चालकाने यु टर्न घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला.परंतू पोलिसांनी लगेच पाठलाग केला असता आरोपिंनी गौतमनगर परिसरात आपले वाहन सोडून देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला.पोलिसांनीही पाठलाग सूरुच ठेवल्याने मात्र विवेक सुरेश गजभिये (३०) व सखन श्यामलाल भलावी (२३) रा. कपिलनगर नागपूर हे दोन्ही आरोपी पोलिसांच्या हाती लागले.कारची झडती घेतली असता ३५ खर्ड्याच्या बाॅक्समध्ये राॅकेट संत्रा देशी दारुच्या ३ लाख ५० हजार रुपये किंमतीच्या ३ हजार ५०० शिश्या आढळून आल्या. तसेच १० लाख रुपये किंमतीची क्रेटा कार जप्त करण्यात आली.आरोपिंविरुद्ध दारुबंदी कायद्याअंतर्गत कारवाई करुन गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई भद्रावती पोलिस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक अमोल तुळजेवार,पोलिस शिपाई सचिन गुरनुले, केशव चिटगिरे, हेमराज प्रधान, शशांक बदामवार यांनी केली.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here