200 युनिट व व्हायरल व्हिडीओ नंतर आमदार जोरगेवार आले पुन्हा चर्चेत

0
1394
Advertisements

चंद्रपूर – सध्या समाजमाध्यमांवर चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार चांगलेच चर्चेत आले आहे, 200 युनिट व सध्या शिवीगाळ करीत असलेला एक व्हिडिओ, प्रत्येक नागरिक हा व्हिडीओ मनसोक्त समाजमाध्यमांवर शेअर करीत आहे.
निवडणुकीपूर्वी 200 युनिट फ्री देणार असे आश्वासन देत रेकॉर्डब्रेक मताने चंद्रपूर आमदार पदी निवडून आले, त्यानंतर त्यांच्या कामाची चर्चा पूर्ण शहरात रंगू लागली, त्यानंतर मात्र 200 युनिट फ्री द्या म्हणून आमदारांना चांगलेच ट्रोल करू लागले, 200 युनिटचा परिणाम उलट होताच फेसबुक लाईव्ह सुद्धा बंद करण्यात आले.
आमदार किशोर जोरगेवार सध्या आपल्या आक्रमक शैलीसाठी ओळखले जातात, सध्या समाजमाध्यमांवर त्यांचा जो व्हिडीओ शेअर होत आहे त्यामध्ये सिद्धबली कंपनी 2 कामगारांच्या मृत्यूवर त्यांचा आक्रोश होता, त्या घटनाक्रमात जी भाषा त्यांच्या तोंडून निघाली ती योग्य नव्हतीच मात्र ती वेळ कामगारांना न्याय देण्याची होती, मात्र विरोधक त्यांच्या मागेच लागले व आमदारांची अशोभनीय भाषा बघा म्हणून व्हिडीओ व्हायरल करू लागले, त्या व्हिडिओचा भविष्यात काय परिणाम होणार हे रे येणारी वेळचं सांगेल.
तर हे होते सध्या सर्वात चर्चेत असलेले आमदार किशोर जोरगेवार जे सध्या मुळीच चर्चेत नाही ते म्हणजे भाजपचे स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार रामदास आंबटकर 2018 ला चंद्रपूर, गडचिरोली व वर्धा क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेमधून ते निवडून आले.
त्यानंतर ते फक्त लोकसभा व विधानसभा निवडणुकीत नंतर कुणाला दिसलेच नाही, चंद्रपूर जिल्ह्यात त्यांचं नाव किती जणांना माहीत असेल हे सांगणे खूप जास्ती कठीण आहे.
कोविडच्या महामारीत सुद्धा त्यांचा चेहरा कुणी बघितला नाही, गडचिरोली, चंद्रपुरातील कोविड परिस्थितीचा त्यांनी आढावा पण घेतला नाही.
आपल्या जिल्ह्यातील मत घेत फक्त निवडून यायचं आणि निवडणुकीत आपला चेहरा दाखवायचा हे कसले आमदार आहे, त्यांना आपल्या कार्याची जाणीव नाही का? आज भाजप पक्षातील सोशल मीडिया टीम अपक्ष आमदार जोरगेवार यांना चांगलेच ट्रोल करीत आहे मात्र स्वतःच्या पक्षाच्या आमदारांचे कर्तृत्व नागरिकांच्या समोर असे जाहीर मांडायला हवे?
आपला आमदार नागरिकांच्या समस्येची दखल घेतो का? या प्रश्नाचे जाहीर उत्तर नागरिकांनी विचारायला पाहिजे, ते कुणी असो अपक्ष आमदार जोरगेवार की आमदार रामदास आंबटकर.
जोरगेवार यांच्या आधीचे आमदार काय करीत होते, किती नागरिकांच्या त्यांनी समस्या सोडविल्या हे शहरातील नागरिकांना चांगलेच ठाऊक आहे.
आमदार आपल्या कार्यात कसूर करत असतील तर आपला अधिकार आहे त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव करून द्यायला हवी.

पालिका, जिल्हा परिषद, नगर परिषदेमधील सदस्यांच्याया मतदानाच्याया भरवश्यावर रामदास आंबटकर निवडून आले मात्र त्यांना चंद्रपुरात येण्यासाठी फक्त निवडणुकीचे कारण लागत असतील तर ते काय कामाचे? कोरोनाच्या या काळात त्यांना आपल्या क्षेत्राची जाणीवच नसेल तर मग पद कशाला घ्यावं?

Advertisements

कमीतकमी आमदार जोरगेवार नागरिकांच्या समस्येला धावून जातात, वाईट असो की चांगले त्यांचे व्हिडीओ विरोधक लोक व्हायरल करीत असल्याने ही बाब आमदार जोरगेवार यांच्यासाठी चांगलीच आहे, एकंदरीत आमदार जोरगेवार हे चर्चेत असतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here