चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील पोलीस विभागात मोठे फेरबदल झाले आहे, पोलीस निरीक्षकांच्या बदल्या व महत्वपूर्ण पदाचे वाटप करण्यात आले असून स्थानीक गुन्हे शाखेचे ओमप्रकाश कोकाटे यांची बदली नागपूर ग्रामीण तर चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक पदाची माळ बाळासाहेब खाडे यांच्या गळ्यात पडली आहे.
वरोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांची बदली बल्लारपुर तर दुर्गापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार खोब्रागडे यांची बदली वरोरा पोलीस स्टेशनला करण्यात आली.
पोलीस निरीक्षकासह पोलीस उपनिरीक्षक यांच्या सुद्धा बदल्या विविध तालुक्यातील ठाण्यात करण्यात आली असून तसा लेखी आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी काढला आहे.
खाडे यांची स्थानिक गुन्हे शाखेची बदली रद्द होऊ नये यासाठी कोकाटे यांना तात्काळ रवानगी करण्यात आली.
चंद्रपूर पोलीस उपनिरीक्षक बदली
पोलीस उपनिरीक्षक सुधीर जाधव यांची बदली राजुरा पोलीस स्टेशन, प्रभूदास माहुलीकर पडोली, अशोक बोडे भद्रावती, पुरुषोत्तम राठोड नियंत्रण कक्ष, चंद्रपूर, राजकुमार गुरले नियंत्रण कक्ष, (news34)किशोर सहारे दुर्गापूर, राजू मेंढे जी.वि.शा. चंद्रपूर, चंद्रकांत लांबट सीसीटीएनएस प्रकल्प, महादेव सरोदे शेगाव पोलीस स्टेशनला बदली करण्यात आली आहे.