चंद्रपूर मनपात भव्य बॅनरच्या नावाखाली भ्रष्टाचार

0
746
Advertisements

चंद्रपूर – चंद्रपूर मनपाचा महसूल वाढावा यासाठी पालिकेने खाजगी कंपन्यांना शहरातील विविध भागात बॅनर लावण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्या होत्या मात्र आज बॅनर लावणारी कंपनी व पालिकेचा करार संपला का? त्यांच्याकडून नियमित कर वसुली होत आहे की यामध्ये सुद्धा पालिकेचं धोरण अस्पष्ट आहे?
यावर शहर शिवसेनेने आपली भूमिका मांडत शहरातील भव्य बॅनर फाडून टाकत चंद्रपूर मनपाचा निषेध केला.
सध्या जे भव्य बॅनर शहरात झळकत आहे त्याची परवानगी पालिकेकडून घेण्यात येत आहे का? कंपनी व पालिकेचा करार अजून किती दिवस आहे? असे अनेक प्रश्न शहर शिवसेनेतर्फे पालिकेतील अधिकाऱ्यांना विचारण्यात आले मात्र यामध्ये धक्कादायक बाब की हे सर्व भव्य बॅनर अवैध असल्याची माहिती शिवसेनेने दिली आहे.
याबाबत शहर शिवसेनेतर्फे निवेदन देत 5 दिवसात बॅनर काढण्याची मागणी केली मात्र पालिकेद्वारा कारवाई न केल्याने शिवसेना स्टाईल ने शहरात लागलेले भव्य बॅनर फाडण्यात आले.
शहरातील अवैध बॅनर तात्काळ काढण्यात यावे अन्यथा शिवसेना आपल्या परीने बॅनर काढण्यास समर्थ असल्याचा इशारा पालिकेला दिला आहे.
शिवसेनेचा आरोप आहे की पालिकेतील काही पदाधिकारी व बॅनर कंपन्यांचं आपसात संगनमत असल्याने भ्रष्टाचाराला वाव देण्याचं काम सध्या मनपात मोठ्या प्रमाणात सुरू, पालिकेचे व सत्ताधाऱ्यांचे बॅनर त्या विशिष्ट जागेवर लावण्यासाठी तडजोड करण्याचे काम पालिका करीत आहे असा थेट आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला.

शहरातील भव्य बॅनर चा पैसा जातो तरी कुठे? बॅनर च्या नावाखाली चंद्रपूर मनपात भ्रष्टाचाराची पोळी शेकल्या जात आहे असा आरोप सुद्धा यावेळी शिवसेनेतर्फे करण्यात आला.

Advertisements

यावेळी शिवसेना महानगरप्रमुख प्रमोद पाटील, कुसुम उदार, अर्जुन धुना, विक्रांत सहारे व शिवसेना कार्यकर्ता उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here