अवैध धंदे करणाऱ्या खलनायकांच्या एरियात नायकाची धडाकेबाज कारवाई

0
1511
Advertisements

प्रतिनिधी/गणेश लोंढे

नांदाफाटा – वर्ष 2015 पासून जिल्हा दारूबंदी घोषित मात्र अवैध दारू तस्करी जोमात सुरू असल्याने पोलीस प्रशासन आपल्या परीने दारू तस्करांच्या मुसक्या आवळण्याचं काम करीत आहे.
गडचांदूर हद्दीत अनेक अवैध धंदे सुरू असून गडचांदुर उपविभागीय पोलीस अधिकारी यामावार यांची बदली झाल्याने गडचांदुरातुन उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यकाळाची सुरुवात करणारे सुशील कुमार नायक यांची पुन्हा त्याच ठिकाणी वर्णी लागल्याने त्यांनी धडाकेबाज कारवाई करीत अवैध दारूचा ट्रक पकडला ज्यामध्ये मुद्देमालासाहित एकूण 25 लाखांचा दारूसाठा जप्त केला आहे.

Advertisements

गुप्त माहितीच्या आधारे चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी गडचांदूर यांच्या नेतृत्वात यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथून एका ट्रक मधून अवैद्य दारूची तस्करी होत असल्याची माहिती मिळताच सूत्र हलवीत सापळा रचून नाके बंदी करून गडचांदूर शहरातिल कन्या शाळेजवळ मार्गावर M H 40 BG – 6947 या ट्रकची झडती घेतली असता २५७ देशी दारुच्या पेटी आढळल्या त्याची किंमत अंदाजे २५ लाख ७० हजार ट्रकची किंमत अंदाजे १५ लाख एकूण ४०,लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यातील ट्रक चालक राहुल पाहुनकर या आरोपीला अटक करण्यात आली आहे सदर दारू तस्करीत आणखी तीन आरोपी ज्यांचा यात सहभाग आहे त्यांना अटक करायची असून हा दारूचा साठा कुठे जाणार असून त्यांचे रिसिव्हर कोण याबाबत पुढील तपास चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली गडचांदूर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक यांनी दिली आहे.

गडचांदुरात परिसरात आजही अवैध दारूचा व्यवसाय करणार्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, ठोक व चिल्लर विक्रेत्यांवर सुद्धा कठोर कारवाई व्हावी अशी नागरिकांची मागणी आहे, गडचांदूर उपविभागात गडचांदूर,नांदा फाटा,शांती कॉलोनी,नथु कॉलनी पेट्रोल पंप आवाळपुर मार्ग येथील दारू तस्करांच्या व विक्रेत्यांच्या मुसक्या आवळाव्या अशी मागणी नागरिक करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here