भद्रावतीत रक्तदान करुन ईद साजरी

0
232
Advertisements

भद्रावती/अब्बास अजानी

भद्रावती शहरातील जश्ने-ईद-मिलादुन्नबी कमिटीतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करुन ईद-ए- मिलाद उन्नबी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या निमित्याने स्थानिक मदिना मश्जिद येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले.त्यात ६२ युवकांनी रक्तदान केले.कोरोना प्रादुर्भावाचा काळ लक्षात घेता सदर कार्यक्रम अत्यंत साधेपणाने पार पाडण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी मुनाज शेख कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.तर प्रमुख अतिथी म्हणून प्रभारी ठाणेदार मडावी,ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.सातभाई,नगरसेवक हाजी जावेद शेख, हाजी जाकीरभाई उपस्थित होते.
यावेळी रक्तसंकलनाचे कार्य चंद्रपूर येथील रक्त संकलन केंद्राचे पंकज पवार, जयस्वाल व योगेश जारुडे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरीता जफर अहमद,तुफेल शेख,हाजी शाहीद अली, एजाज अली,अफझल शेख, डाॅ.शकील,फयाज शेख,शनू अहमद, शमशाद, अलीम, रेहान, अनिस खाॅं, इम्रान,नौशाद अली यांनी परिश्रम घेतले.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here