चंद्रपूर – राज्यपाल कोट्यातून मनोणीत होणाऱ्या आमदारांसाठी महाविकास आघाडीची मोर्चेबांधणी सुरू असून विविध क्षेत्रातील मान्यवरांना यंदा आमदार होण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
नागरिकांना आश्चर्यचकित करणारे नाव म्हणजेचं भारिप, वंचित बहुजन आघाडी मधून आमदारकीची निवडणूक लढलेले अनिरुद्ध वनकर यांचं नाव कांग्रेस पक्षातर्फे समोर आले आहे, हे कुणालाही न समजणारे नाव.
राजकारणात कधी काय होणार याचा नेम नसतोचं, एकेकाळी निवडणुकीत कांग्रेसचा समाचार घ्यायचा व नंतर कांग्रेसच बाशिंग बांधून आमदारकीसाठी तयार व्हायचं.
2014 ला भारिप मधून अनिरुद्ध वनकर यांनी विधानसभेची निवडणूक लढली, नंतर 2019 ला वंचित बहुजन आघाडीमधून सरळ स्वतःची जमानत सुद्धा वाचवू शकले नाही.
वनकर यांचं नाव नाट्यक्षेत्रात मोठे आहे, त्यांनी नॅशनल ड्रामा स्कुलमधून कला क्षेत्राचे धडे गिरवले, झाडी पट्टीत त्यांचं योगदान मोठे आहे, त्यांच्या आवाजाची जादू तर कमालचं.
मात्र राजकारणातील महत्वकांक्षी इच्छा म्हणजे आमदारकी.
त्यासाठी त्यांनी मुंबई ते दिल्ली ला वारंवार भेटी देत आज आपलं नाव हे पक्षांतर्गत पुढे आणले.
मात्र 2014 व 19 ला झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत कांग्रेस विरोधात प्रचार, कांग्रेसवर सतत टीका, इतकेच नव्हे तर त्यांनी कांग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यावर सुद्धा टीकास्त्र सोडले.
आजही त्यांनी वंचित बहुजन आघाडीचा राजीनामा दिलेला नाही, याबाबत पक्षश्रेष्ठी सोबत चर्चा सुद्धा केलेली नाही.
कांग्रेस पक्षावर इतकी टीका केल्यावर खुद्द कांग्रेस पक्ष त्यांचं नाव कस काय समोर करू शकते ही राजकारणाच्या पलीकडली बाब आहे.
कला क्षेत्रात कांग्रेसला समर्थन करणारा कुणीच नाही का? की पक्षातील काही नेते आपल्या राजकीय स्वार्थासाठी अनिरुद्ध वनकर यांचं नाव समोर करीत आहे.
यावर विदर्भातील कांग्रेस कार्यकर्ते जाम नाराज असल्याची चर्चा आहे, कार्यकर्ते आपल्या मनातील खदखद कांग्रेस पक्षश्रेष्ठी समोर मांडणार आहे.
व्वा रे राजकारण…! वनकर यांच्या नावावरून कांग्रेस पक्षात महासंग्राम
Advertisements