रक्तदान करून मुस्लिम बांधवांनी केली “ह.म.पैगंबर जयंती” साजरी

0
147
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
कोरोना महामारीने देशात अक्षरशः आतंक माजविला असून सध्या रुग्णांची संख्या कमी होत असली तरी रुग्णालयात रक्त साठा अपुरा पडत असल्याचे पहायला चित्र आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ठिकठिकाणी रक्तदान शिबीराचे आयोजन करून रक्तदान करण्यात येत आहे.याच श्रेणीत मुस्लिम धर्मीयांचे आदर्श स्थान असलेले “हज़रत मोहम्मद पैगंबर” यांच्या जयंती निमित्य शुक्रवार रोजी गडचांदूर येथील मुस्लिम बांधवांनी रॅली न काढता सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या उद्देशाने रक्तदान शिबीराचे आयोजन केले.तसेच स्थानिक ग्रामीण रुग्णालय येथे रूग्णांना फळ वाटप करण्यात आले.चंद्रपूर रक्तपेटी यांनी रक्त संकलन केले.कोरोनाच्या धर्तीवर शासनाच्या नियमांचे पालन करत अंदाजे 60 मुस्लिम बांधवांनी रक्तदान केले.सदर दोन्ही कार्यक्रमात मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांनी उपस्थिती दर्शवली होती. शहरातील मशिदींना आक्रर्षक रोषणाईने सजविण्यात आले होते.एकुणच हा सण मुस्लिम बांधवांनी मोठ्या हर्षोल्हास व सामाजिक बांधिलकी जपत साजरा केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here