स्थानिक गुन्हे शाखेच्या पदावर पोलीस निरीक्षक बाळकृष्ण खाडे यांची लागणार वर्णी?

0
1163
Advertisements

चंद्रपूर – स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक कोकाटे यांचा कार्यकाळ संपत आल्याने आता नवीन जबाबदारी कुणाला मिळणार यावर सध्या डिपार्टमेंट मध्ये खमंग चर्चा सुरू झाली आहे.
काही दिवसांपूर्वी भंडारा येथील कंकाळे यांचं नाव समोर आले होते मात्र आता अचानक ब्रह्मपुरी येथील पोलीस निरीक्षक बाळकृष्ण खाडे यांचं नाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकपदी वर्णी लागणार असल्याची माहिती सुत्रांद्वारे मिळाली आहे.
खाडे हे सध्या ब्रह्मपुरी पोलीस स्टेशन येथे ठाणेदार म्हणून जबाबदारी पार पाडत आहे, ब्रह्मपुरी क्षेत्रात सध्या अवैध दारू, सट्टा बाजार, कोंबडा बाजार व रेती तस्करीचे हब असे अनेक अवैध धंदे जोमात सुरू आहे. यावर त्यांचं नियंत्रण मुळीच नाही, काही दिवस अगोदर एका तक्रारदाराला त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये मारहाण केल्याचा प्रकार घडला होता.
व नंतर ब्रह्मपुरी येथील व्हायरल झालेली 1 ऑडिओ क्लिप मध्ये सुद्धा त्यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला.
पोलीस निरीक्षक खाडे हे याआधी वणी येथे कार्यरत होते, त्या भागात त्यांचा कार्यकाळ खूप वादग्रस्त राहिला होता?
वणी नंतर त्यांची बदली सावली येथे करण्यात आली, लॉकडाउन काळात ते कोरेनटाईन झाले होते.
आता ब्रह्मपुरी म्हणजेच जिल्ह्याचे ताकदवर पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या विधानसभेत त्यांचा कार्यकाळ सुरू असून अवैध धंदे जोमात आहे.
त्या क्षेत्रात अवैध धंद्यांना पाठबळ कुणाचं हे आजपर्यंत कुणाच्या लक्षात आलेले नाही.
जिल्ह्यातील नवनियुक्त जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे चंद्रपुरात आले असले तरी अजूनपर्यंत त्यांची छाप चंद्रपूरकरांवर पडलेली नाही.
जिल्ह्यातील अवैध धंदे नियंत्रणात येणार असे जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या येण्याने नागरिकांना वाटले होते मात्र जिल्ह्यात उलट खुनी संघर्ष वाढला.
तरीसुद्धा पालकमंत्री वडेट्टीवार यांनी आक्रमक भूमिका घेतली नाही, सध्या जिल्ह्यात अवैध दारू विकणाऱ्या मोहल्ला कमिटी मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे, त्यांना पाठबळ कुणाचं? दारू सुरू होणार का? कधी कोणत्या महिन्यात याची फक्त तारीख पे तारीख सुरू आहे.
मंत्र्यांच्या विधानसभा क्षेत्रात अवैध धंद्यांवर नियंत्रण मिळणे कठीण असून आता त्या भागातील पोलीस निरीक्षक यांना महत्वाची जबाबदारी म्हणजेच स्थानिक गुन्हे शाखेच पद हे कितपत योग्य आहे?
स्थानिक गुन्हे शाखेच्या महत्वपूर्ण पदावर चांगल्या अधिकाऱ्याची नियुक्ती व्हावी अशी खमंग चर्चा पोलीस प्रशासनात सुरू झाली आहे.
सध्यातरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्या बदलीची ऑर्डर झालेली नसून ती आज उद्या होणार असून त्या पदासाठी मजबूत फिल्डिंग लागलेली आहे.

पोलीस निरीक्षक खाडे यांचं अजूनही ब्रह्मपुरी क्षेत्रातील अवैध धंद्यावर नियंत्रण नसून ते जिल्ह्यातील अवैध धंदे थांबविणार तरी कसे?

Advertisements

नाहीतर भविष्यात अवैध धंद्यांचं माहेरघर म्हणून जिल्ह्याचं नाव असणार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here