चंद्रपूर जिल्ह्यात चार बाधितांचा मृत्यू ;197 नव्याने पॉझिटिव्ह

0
426
Advertisements

चंद्रपूर, दि. 30 ऑक्टोबर : जिल्ह्यात गेल्या 24 तासात कोरोनामुळे चार मृत्यू झाले असून 197 नवीन बाधितांची भर पडली आहे. आतापर्यंत बाधितांची एकूण संख्या 15 हजार 635 वर पोहोचली आहे. तसेच 24 तासात 175 बाधित कोरोनातून बरे झाल्याने सुरवाती पासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 12 हजार 522 झाली आहे. सध्या 2 हजार 882 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 19 हजार 520 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 1 लाख 2 हजार 332 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली येथील 55 वर्षीय महिला व आरमोरी येथील 45 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तर सिंदेवाही तालुक्यातील नांदगाव येथील 77 वर्षीय महिला, मुल येथील 80 वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 231 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 216, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली सहा, यवतमाळ पाच, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

तालुकानिहाय बाधितांची संख्या:

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये 113 पुरूष व 84 महिलांचा समावेश आहे. यात चंद्रपूर शहर व परिसरातील 58, पोंभुर्णा तालुक्यातील एक, बल्लारपूर तालुक्यातील 9, चिमुर तालुक्यातील 9, मुल तालुक्यातील 13, गोंडपिपरी तालुक्यातील सात, जिवती तालुक्यातील दोन, कोरपना तालुक्यातील 14, ब्रह्मपुरी तालुक्यातील 18, नागभीड तालुक्यातील सात, वरोरा तालुक्यातील 18, भद्रावती तालुक्यातील 13, सावली तालुक्यातील पाच, सिंदेवाही तालुक्यातील 12, राजुरा तालुक्यातील तीन, गडचिरोली सात तर वणी-यवतमाळ येथील एक असे एकूण 197 बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

बालाजी वार्ड, घुटकाळा वार्ड, भिवापुर वॉर्ड, नगीना बाग, पत्रकार नगर, रामनगर, राणी लक्ष्मी वार्ड, कृष्णा नगर, जल नगर वार्ड, इंदिरानगर, रहमत नगर, आंबेडकर नगर बाबुपेठ, साईनगर, हॉस्पिटल वार्ड, समाधी वार्ड, बंगाली कॅम्प परिसर, तुकूम भागातून बाधित ठरले आहे.

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:

वरोरा तालुक्यातील यात्रा वार्ड, विनायक लेआउट, आनंदवन, हनुमान वार्ड, गांधी वार्ड, मित्र चौक परिसर, इंदिरानगर, राम मंदिर वार्ड, दत्त मंदिर वार्ड परिसरातून पॉझिटीव्ह पुढे आले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील विद्यानगर, अर्जुनी मोरगाव, चिचखेडा, बोंडेगाव, कोरंबी टोला, बालाजी वार्ड, शांतीनगर परिसरातून बाधित ठरले आहे.

भद्रावती तालुक्यातील मंजुषा लेआउट, जुना सुमठाणा, घोडपेठ, झाडे प्लॉट परिसर, सुरक्षा नगर, कटारिया लेआउट, अहिल्यादेवी नगर परिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे. राजुरा तालुक्यातील चुनाळा, हनुमान मंदिर सास्ती भागातून बाधित पुढे आले आहे.

सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही, नवरगाव, रत्नापूर, लाडबोरी परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. नागभीड तालुक्यातील शिवाजी चौक,कोरधा भागातून बाधित पुढे आले आहे.

कोरपना तालुक्यातील माणिक गड कॉलनी परिसर, गांधी चौक, नांदा फाटा, नोकारी, गडचांदुर, कैलाश नगर मांगोली, पावडे लेआउट, विद्यानगर, शिवनगर वार्ड भागातून बाधित ठरले आहे. मुल तालुक्यातील वार्ड नंबर 11, मारोडा, गडीसुर्ला परिसरातून बाधित ठरले आहे. बल्लारपूर तालुक्यातील विसापूर,राणी बाई वार्ड परिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे.

चिमूर तालुक्यातील पिंपळनेरी, गांधी वार्ड, आझाद वार्ड, आबादी वार्ड, किटाळी, शिरपूर, शंकरपुर भागातून बाधित ठरले आहे. गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी, सुखवासी, धाबा परिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे.सावली तालुक्यातील चक पिरंजी, विहिरगाव भागातून बाधित ठरले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here