केमिकल युक्त टाकीत कामगारांचा जीव गुदमरला

0
531
Advertisements

चंद्रपूर – बल्लारपुरातील बामणी येथील प्रोटीन कंपनीत टॅंक सफाई करीत असताना 1 कामगाराचा मृत्यू तर 5 कामगार जखमी असल्याची माहिती समोर आली.
रिकामी टॅंकची साफसफाई करण्याकरिता 1 कामगार खाली उतरला होता परंतु काही वेळानंतर तो बेशुद्धावस्थेत आढळला. ती टॅंक 25 फूट खोल असल्याची माहिती आहे, अनेक दिवसांपासून टॅंक घाण अवस्थेत असल्याने साफसफाई करण्याची जबाबदारी कामगारांना दिली होती.
कामगार बेशुद्धावस्थेत असल्याची माहिती मिळाल्याने 5 कामगार टॅंक मध्ये उतरून बेशुद्ध कामगाराला बाहेर काढण्यासाठी उतरले असता ते सुद्धा बेशुद्ध झाले.
तात्काळ कंपनी व्यवस्थापनाने कामगारांना बाहेर काढुन चंद्रपूर येथे हलविण्यात आले.
उपचारासाठी नेत असतांना 40 वर्षीय विशाल माऊलीकर यांचा मृत्यू झाला, 35 वर्षीय बंडू निवलकर, शैलेश गावंडे, मनोज मडावी, कपिल मडावी, अविनाश चौधरी हे सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे.
ती टॅंक केमिकल युक्त होती व त्यामध्ये गुदमरून कामगार बेशुद्ध झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here