अवैध दारूवर उत्पादन शुल्क विभागाचा वॉच

0
483
Advertisements

चंद्रपूर – सध्या उत्सवाचे दिवस असल्याने चंद्रपूर जिल्ह्यात अवैध दारू मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता नाकारता येत नाही, या सर्व हालचालींवर उत्पादन शुल्क विभागाचा वॉच आहे.
30 ऑक्टोम्बरला शहरात अवैध दारू येणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली.
त्या प्रमाणे पहाटे 5 वाजता पडोली टी पॉईंट वर उत्पादन शुल्क विभागातील भरारी पथकाने सापळा रचला होता.
इंडिगो वाहन क्रमांक एमएच34 के 6199 ला थांबविण्याचा प्रयत्न केला असता, परंतु वाहनचालकाने वाहन न थांबविता भरधाव वेगात चंद्रपूर शहराच्या दिशेने नेले.
वाहन लखमापूर हनुमान मंदिर परिसराच्या गल्लीत उभे करून वाहनचालक मोक्यावरून पसार झाला.
भरारी पथकातील कर्मचाऱ्यांनी वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये देशीच्या 90 मिली क्षमतेचे एकूण 30 बॉक्स जप्त केले.
वाहनसाहित एकूण 2 लाख 78 हजारांचा मुद्देमाल उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला.
सदरची कारवाई उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सागर धोमकर यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकातील अमित क्षीरसागर, चेतन अवचट, सुदर्शन राखूडें व जगन पट्टलवार यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here