मयुरीच्या बछड्याचा मृत्यू, दोघांवर उपचार सुरू

0
350
Advertisements

चंद्रपूर – ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर अंतर्गत बफर क्षेत्रातील खडसंगी वनपरिक्षेत्र कक्ष क्रमांक 53 मध्ये 27 ऑक्टोम्बरला गस्ती दरम्यान वन कर्मचाऱ्यांना वाघिणीचे 3 बछडे अशक्त परिस्थिती मध्ये आढळले होते.
त्यापैकी एकाला प्राथमिक उपचारासाठी चंद्रपूरला नेण्यात आले असता त्या बछड्याचा मृत्यू झाला.
29 ऑक्टोम्बरला त्या मृत बछड्याचे शवविच्छेदन करून दहन केले.
सध्या त्या 2 बछड्याचा उपचार प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू आहे, वन कर्मचारी त्या बछड्याचा आईचा शोध घेत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार त्या बछड्याचा आईचे नाव मयुरी असल्याचे समजते, मयुरी व 3 बछडे नेहमी नवेगाव बफर क्षेत्रात अनेकांना वावरताना दिसले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here