Advertisements
चंद्रपूर – बरांज कोळसा खाणीतील काम चालू करण्याआधी प्रकल्पग्रस्तांच्या समस्या आधी निकाली काढा या मागणीचे निवेदन खासदार, जिल्हाधिकारी यांना दिले होते मात्र प्रशासन व कंपनी व्यवस्थापनाकडून याबाबत कोणत्याही हालचाली करण्यात आल्या नाही.
31 मार्च 2015 पासून बरांज कोळसा खाण बंद करण्यात आली होती, त्यादिवसपासून अनेक कामगार बेरोजगार झाले, कामगारांचे थकीत वेतन मिळाले नाही, भविष्य निर्वाह निधी देण्यात आली नाही, अश्या अनेक मागण्यासाठी आज भद्रावती ते चंद्रपूर पर्यंत कामगार व प्रकल्पग्रस्तांनी पायदळ मोर्चा काढत जिल्हा प्रशासनाने लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
मात्र पोलीस प्रशासनाने ताडाळी जवळ आंदोलकांना अटक केली, आमच्या मागण्या मान्य करायच्या नाही व कामगारांवर ही दडपशाही योग्य नाही.