चंद्रपूर जिल्ह्याला 3 मंत्र्यांचा आधार

0
1043
Advertisements

चंद्रपूर – राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असल्याने तिन्ही पक्षाच्या अध्यक्षांनी आपला पक्ष राज्यात कशाप्रकारे वाढणार यावर लक्ष केंद्रित केले आहे.
पुढे निवडणुकीत कांग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना एकत्र येत निवडणूक लढणार की स्वबळावर यावर मात्र सध्या प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी तिन्ही पक्ष एकत्र येत राज्यावर सत्ता स्थापन करण्यात यशस्वी झाली.
मात्र पुढे काय? येणाऱ्या जिल्हापरिषद, महानगरपालिका निवडणुकीत या तिन्ही पक्षाची काय भूमिका असेल हे अद्याप अस्पष्ट आहे.
यासाठी तिन्ही पक्षाने पक्ष संघटन वाढविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात संघटनात्मक ताकद वाढविण्याचे पदाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात राज्याचे कॅबिनेट मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे पालकमंत्री पदाची जबाबदारी सांभाळत आहे.
कांग्रेसनंतर आता राष्ट्रवादी कांग्रेसचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना चंद्रपूर जिल्ह्याच्या संपर्क मंत्रीची जबाबदारी दिली, त्यानंतर आता शिवसेनेने सुद्धा पक्षवाढीसाठी कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांना सुद्धा संपर्क मंत्रीची जबाबदारी दिली.
म्हणजेच एकूण आता चंद्रपूर जिल्ह्याला 3 मंत्र्यांचा आधार मिळाला आहे.
कार्यकर्त्यांचे कामे झटपट व कामे झाल्याने पक्ष संघटन वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी या मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे समजते.
सध्या हे तिन्ही पक्ष जिल्ह्यात पुढे चालून संघटन वाढीसाठी रस्सीखेच करताना दिसले तर नवल वाटू नये.
सध्या तिन्ही पक्षाला पक्ष वाढीसाठी चांगलंच आवाहन मिळाले असून ग्रामीण भागातील तळागाळातील नागरिकांपर्यंत पक्ष पोहचणार हे खरे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here