मुल – संपुर्ण जगात कोविड 19 चा हाहाकार माजला आहे संपुर्ण देश कोरोना संकटाचा सामना करित आहे अजुन पर्यंत धोका कायम आहे कारन लस अजुन पर्यंत विक सित नाही गेल्या सात महिन्या पासून मुल तालुक्यातील कोविड 19 चे काम जिवाची परवा न करता 24 तास सेवा देणाचे काम डॉक्टर , नगरपरिषद कर्मचारी , सफाई कर्मचारी करित आहेत. आपले कुटुंबीय तथा नातेवाईकाच्या सम्पर्क न करता खुप मोठा त्याग हे कोरोना योध्या करित आहेत याची दखल मुल तालुका शिवसेनेने घेतली त्या अनुषं घाने मुल तालुका शिवसेना तालुका प्रमुख नितीन येरोजवार यानी स्वत कोविड 19 केन्द्रात जाऊन कोरोना योध्या कर्तव्यदक्ष वैदकिय अधिकारी डा.तिरथ उराडे, नगर परिषद चे प्रकल्प अधिकारी रितेश भोयर तथा वसंत मोहूर्ले नगर परिषद, तसेस पोलीस शिपाई राकेश फुकट यानी गेल्या सहा महिन्यापासून रोज 68 ते 70 आसोलेशन पॉजिटिव रुग्णाची चाचणी करुन धोका पत्करुन निरंतर काम करणार्या संपुर्ण योध्या चा सत्कार शिवसेना तालुका प्रमुख नितीन येरोजवार यांच्या हस्ते करण्यात आला. तसेस महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या कडे शिवसेनेतर्फे कोरोना योद्धा या पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली या सत्कार प्रसंगी मुल तालुका शिवसेनेचे पदाधिकारी तालुका संघटक महेश चौधरी, मा.ता.प्र.सुनिल काळे, अनिल सोनुले ,उपतालुका प्रमुख रवी शेरकी उपस्थीत होते.
कोरोना योद्धांचे मुल तालुका शिवसेनेतर्फे सत्कार
Advertisements